शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जेलमधून वाहणाऱ्या सांडपाण्याने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:19 IST

जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सांडपाणी चपराशीपुरा परिसरातील नाल्यातून काढण्यात आले आहे. मात्र, नाल्याची अनेक महिन्यांपासून सफाई झालेली नसल्याने ते पाणी यथेच्छ साचले आहे. त्या पाण्यावर डासांचा थर राहत असल्याने परिसरातील नागरिकांना मलेरियाचा आजार होण्याची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देनाला तुंबला : दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव, महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सांडपाणी चपराशीपुरा परिसरातील नाल्यातून काढण्यात आले आहे. मात्र, नाल्याची अनेक महिन्यांपासून सफाई झालेली नसल्याने ते पाणी यथेच्छ साचले आहे. त्या पाण्यावर डासांचा थर राहत असल्याने परिसरातील नागरिकांना मलेरियाचा आजार होण्याची शक्यता बळावली आहे.चपराशीपुरा परिसरात बहुतांश नागरिक दाटीवाटीने वास्तव्य करीत असल्याने तेथे मोकळी हवा दुर्लभच. त्यातही नाल्यांची नियमित सफाई होत नसल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढणे साहजिकच. अमरावती मध्यवर्ती कारागृहात शेकडो बंद्यांसह कर्मचारी राहतात. तेथील सांडपाणी गजानननगरातील नाल्यातून काढण्यात आले आहे. परंतु कारागृहाच्या जागेतील ती नाली गाळाने बुजली असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. नालीऐवजी खुल्या जागेतून पाणी वाहत आहे. पुढे गजानननगरातील नाल्यात जात होते. मात्र, अनेक दिवसांपासून तो नाला कचऱ्याने पूर्णत: तुंबल्यामुळे सांडपाणी नाल्याच्या वरच्या भागात जमा होत आहे. परिणामी साचलेल्या सांडपाण्यावर डासांचा थर कायम राहत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महापालिकेने लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी 'लोकमत'शी बोलताना दिल्यात.दमट वातावरणाचा परिणामचपराशीपुरा प्रभागात सामान्य नागरिकांचे वास्तव्य असल्याने तोकड्या जागेत शक्य तशा पद्धतीने घरे बांधून नागरिक वास्तव्य करतात. त्यामुळे दमट वातावरणात मुंबईप्रमाणे जीवन जगण्याचा अनुभव येथील नागरिक घेत आहेत. त्यातही सफाईअभावी दुर्गंधीचा सामना करावे लागत असल्याने आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे.गत वर्षात डेंग्यूनेचा कहरआॅगस्ट ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान शहरात डेंग्यू आजाराने कहरच केला. याबाबत 'लोकमत'ने मालिकाच चालविली. याची दखल घेतल्याने काही भागातील समस्या निवारण्यात आली. या भागात सर्वाधिक नागरिक डेंग्यूने आजारी होते. ही स्थिती अस्वच्छतेमुळे उदभवल्यानंतरही येथील अद्याप स्थिती सुधारलेली नाही