शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

नागरिकांनी मुख्य रस्त्यावर टाकला कचरा!

By admin | Updated: August 17, 2015 00:08 IST

जुन्या वस्तीतील इंदिरानगरात संगळून असलेला केरकचरा लगतच्या मुख्य चौकात मधोमध टाकून नगरसेवक तसेच ....

नगरसेवकांचा निषेध : बडनेऱ्यातील इंदिरानगरवासी संतप्तश्यामकांत सहस्त्रभोजने  बडनेराजुन्या वस्तीतील इंदिरानगरात संगळून असलेला केरकचरा लगतच्या मुख्य चौकात मधोमध टाकून नगरसेवक तसेच महानगरपालिका प्रशासनाचा नागरिकांनी प्रतिकात्मक निषेध नोंदविला. नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत चौकाचौकांत अशाच पद्धतीने केरकचरा रस्त्यावर आणून आंदोलन छेडण्याचा इशारा यातून दिला आहे. जुन्या वस्तीतील प्रभाग क्रमांक ४१ मधील इंदिरानगर परिसरात कित्येक दिवसांपासून ओला कचरा विद्युत डीबीजवळ संगळून होता. परिसरातील रहिवाशांना या ओल्या कचऱ्याचा मोठा मन:स्ताप सहन करावा लागत होता. रस्त्याच्या कडेलाच संगळून असणारा केरकचरा रस्त्यावर येत होता. सध्या आजाराने तोंड वर काढले आहे. अनेकदा या परिसरातील नागरिकांनी दोन्ही नगरसेवकांना हा कचरा उचलण्याची विनंती केल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. १५ आॅगस्टमुळे केरकचऱ्याचा ढिगारा उचलण्यासाठी नागरिकांनी तगादा लावला होता. मात्र कचरा उचलण्यात आला नाही. त्याचाच रोष व्यक्त करीत परिसर नागरिकांनी १६ आॅगस्ट रोजी रस्त्यावर कचरा साठविला. हा केरकचरा नागरिकांनी सरळ चावडी चौक स्थित चौफुलीवर आणून मनपा प्रशासनाचा व नगरसेवकांचा निषेध नोंदविला. अशीच स्थिती राहिल्यास प्रत्येक चौकाचौकांत अशा स्वरुपाचे प्रतिकात्मक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)कोरडा, ओला कचरा उचलण्याचा स्वतंत्र ठेकाप्रभागात साफ केलेला केरकचरा प्रभागातच संगळून ठेवला जातो. ठिकठिकाणी असे छोटे कम्पोस्ट करवून ठेवण्यात आले आहे. ‘लोकमत’ने अनेकदा याविरोधात वृत्त प्रकाशित केले आहे. मात्र, महापालिका प्रशासन त्याची दखलच घेत नसल्यामुळे नागरिकांना याचा नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो आहे. ट्रक चालक नियमित संगळून ठेवलेला कचरा उचलत नसल्यामुळेच केरकचऱ्याचे ढिगारे ठिकठिकाणी साचून राहते, हे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. केरकचरा उचलणाऱ्यांची ही जबाबदारी असल्याचे बोलले जात होते.इंदिरानगरवासीयांनी या परिसरात संगळून असणारा केरकचरा उचलण्याची विनंती संबंधित दोन्ही नगरसेवकांना अनेकदा केली. मात्र नागरिकांची दखल न घेतल्यामुळेच प्रतिकात्मक आंदोलन छेडण्यात आले. - सुरेश वानखडे,नागरिक.संपूर्ण बडनेरा शहरासाठी ओला व कोरडा केरकचरा उचलण्यासाठी केवळ एकमेव ट्रक उपलब्ध करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचा संताप वाढला आहे. - जयश्री मोरे,नगरसेविका.ओल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे या परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते. नगरसेवकांनी याची दखल घेणे अत्यंत गरजेचे होते. साफसफाईबाबतचे आंदोलन यापुढे अधिक तीव्र करू.- श्याम बांते,नागरिक.याठिकाणचा ओला व कोरडा कचरा ट्रकद्वारे उचलण्यात यावा, असे मी स्वास्थ्य निरीक्षकास कळविले होते. संगळून असणारा कचरा उचलण्याची जबाबदारी संबंधित विभागाने नीट पार पाडणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम आहे. - विजय नागपुरे,नगरसेवक.