शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

देह व्यापाराविरोधात नागरिकांचा एल्गार

By admin | Updated: December 24, 2015 00:23 IST

अंबाविहारात सुरू असलेल्या देहव्यापाराविरुद्ध बुधवारी नागरिकांनी एल्गार पुकारला. शेकडो महिलां-पुरुषांनी पोलीस आयुक्तावर मोर्चा नेऊन व्यक्तीवर कारवाईची मागणी केली.

पोलीस आयुक्तालयावर मोर्चा : अंबा विहारातील महिलेच्या घराची तोडफोडअमरावती : अंबाविहारात सुरू असलेल्या देहव्यापाराविरुद्ध बुधवारी नागरिकांनी एल्गार पुकारला. शेकडो महिलां-पुरुषांनी पोलीस आयुक्तावर मोर्चा नेऊन व्यक्तीवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर नागरिकांनी त्या महिलेच्या घराची तोडफोड केली. राजापेठ ठाण्यांतर्गत अंबाविहार परिसरातील रहिवासी एक महिला १५ वर्षांपासून देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. यामुळे त्या महिलेच्या घरी दररोज विविध वाहनांतून अनेकजण येतात व सर्रार अश्लील चाळे करतात, असा आरोप नागरिकांचा आहे. देहव्यापार चालू असल्याच्या माहितीवरून अनेकदा पोलिसांनी त्या महिलेच्या घरी धाड टाकली. मात्र, यावर अंकुश लागले नसल्याचे मत अंबाविहारवासियांचे आहे. त्यामुळे बुधवारी अंबा विहारातील शेकडो महिला-पुरुषांनी पोलीस आयुक्तालयावर मोर्चा नेला. तेथे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्याशी नागरिकांनी चर्चा करून त्या महिलेवर कारवाईची मागणी केली. त्यांनीही योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन नागरिकांनी दिले. त्यानंतर काही नागरिकांनी पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनाही निवेदन सोपवून त्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी आयुक्तांनी राजापेठ पोलीस ठाण्यात अधिकाअधिक महिलांनी तक्रार नोंदवावी, असा सल्ला दिला. या मोर्चात राजा बांगडे, राहुल बठाले, सुभाष मारोडकर, दिनकर काटोले, विजय तोड, ज्ञानेश्वर पातसे, यशवंत मोहरे, शरद कांडलकर, एस. एस. बेले, राम वानखडे, वी. कनेरकर, गजानन अनासाने, प्रीतम तांबट, सुरेश निंगोट, अमोल सिरसकर, ओमप्रकाश शर्मा, सुनील निखार, प्रवीण इचे, महादेव वाघमारे आदींची उपस्थिती होती.अंबाविहारात देह व्यापार सुरू असल्याची तक्रार काही महिला व पुरुषांनी केली आहे. मात्र, सद्यस्थितीत तेथे ती महिला राहत नाही. त्या महिलेचा शोध घेऊन कारवाई करू. - एस.एस.भगत, पोलीस निरीक्षक. राजापेठ पोलीस ठाणे.