शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

बयाण अन् चौकशीचा घेरा, पोलिसांमागे सीआयडीचा ससेमिरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:16 IST

पान ३ ची लिड फ्लायरसारखी फोटो : सीआयडीचा लोगो अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या कोठडीतील आरोपीची आत्महत्या व पोलीस ...

पान ३ ची लिड

फ्लायरसारखी

फोटो : सीआयडीचा लोगो

अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या कोठडीतील आरोपीची आत्महत्या व पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांच्या आत्मघाताने एकीकडे शहर पोलीस दल हादरले आहे. त्यामुळे शहर पोलीस दलातील काही पोलिसांची वर्तमान अवस्था ‘बयाण अन् चौकशीचा घेरा, पाठीमागे सीआयडीचा ससेमिरा!’ अशी झाली आहे. राजापेठच्या कोठडीतील सागर ठाकरे आत्महत्या प्रकरणाचा तपास अगदी पहिल्याच दिवशी सीआयडीकडे गेला, तर पीएसआयमुळे आत्महत्या प्रकरण २१ ऑगस्ट रोजी सीआयडीकडे देण्यात आले.

शहर आयुक्तालयातील दोन प्रकरणांचा तपास एकाचवेळी सीआयडीकडे गेल्याने संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना बयाणाला सामोरे जावे लागत आहे. दोन्ही प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज राजापेठ फ्रेजरपुरा व पोलीस आयुक्तालयातून सीआयडीने ताब्यात घेतले. त्यांची न्यायवैद्यक तपासणी केली जाणार आहे. मात्र, त्या फुटेजमुळे पोलीस आयुक्तालयातील सुमारे दीड डझन अधिकारी, कर्मचारी चौकशीच्या टप्प्यात आले आहेत. बयाणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सीआयडी तपासाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. तलवार कोसळावी, मात्र ती मान आपली नसावी, अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा आहे.

बॉक्स

राजापेठ पोलीस ‘बळीचा बकरा?

सध्या पोलीस खात्यात एक चर्चा भलतीच व्हायरल झाली आहे. ती म्हणजे राजापेठ पोलीस बळीचा बकरा तर नाही बनणार ना? गार्ड वगळता पोलीस कोठडीवर २४ बाय ७ वॉच ठेवण्याची जबाबदारी कुणाची होती? ठाणेदाराची, ड्युटी ऑफिसर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकांची की स्टेशन डायरी सांभाळणाऱ्या अंमलदाराची? ही ती चर्चा. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यातील आरोपीला राजापेठच्या पोलीस कोठडीत ठेवले जाते. तेथे तो आत्महत्या करतो, यात दोष पोलिसांचाच. पण राजापेठमधील सरसकट सर्वांनाच शिक्षा होत असेल, तर ते न्यायसंगत होणार नाही, असे उघडपणे बोलले जात आहे.

बॉक्स

‘त्या‘ अधिकाऱ्याला बदलीची घाई

पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलीस आयुक्तालयातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा नामोल्लेख आहे. त्यांची बदली प्रस्तावित आहेच. मात्र, या प्रकरणामुळे त्या अधिकाऱ्याला आता बदलीचे वेध लागले आहे. कधी आपली बदली होईल अन् कधी कार्यमुक्त होऊ, अशी घाई त्यांना झाल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे.