शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चिऊताईवर आधुनिकीकरणाचे संकट

By admin | Updated: March 20, 2016 00:13 IST

घराच्या सभोवताल वावरणारी चिमणी आधुनिकीकरणाच्या विळख्यात सापडली आहे. चिमण्यांना वाचविणाची काय करता येईल,...

चिमणी दिवस : सिमेंटच्या जंगलात हरवल्या चिमण्याअमरावती : घराच्या सभोवताल वावरणारी चिमणी आधुनिकीकरणाच्या विळख्यात सापडली आहे. चिमण्यांना वाचविणाची काय करता येईल, यांची जाणीव ठेवणे आपलीच जबाबदारी आहे. चिऊताईला अभय देऊन खाद्य व राहण्याची सोय करणे हीच खरी मानवता आहे. चिमणी दिवसानिमित्त सिमेंटच्या जंगलात हरवलेल्या चिमण्यांसाठी काही तरी करा, असा संदेश निसर्गप्रेमींनी दिला. २० मार्च रोजी चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात ७ प्रकारच्या चिमण्या असून आपल्या भागातील सर्वात लाडकी चिमणी म्हणजे हाऊस स्पॅरो आहे. तिचा आकार १४ ते १६ सेमी असून वजन २६ ते ३२ ग्राम असते. १९ ते २५ सेमी पंखांचा विस्तार असतो. एकेकाळी या चिमण्या भारतातील सर्वाधिक संख्येने आढळत होत्या. मात्र अलीकडच्या काळात त्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे तिची जागा बुलबुलने घेतली आहे. चिमण्यांसाठी घरटी व उन्हाळ्यात पाणी तर ठेवाच तरच अंगणात येऊन चिमण्या चिवचिवाट करतील. घरातील घरटी कचरा होते म्हणून काढून फेकू नका. त्याचाच उपयोग करून चिमण्याची राहण्याची सोय करा. वैभवच्या घराभोवती चिमण्यांचा किलबिलाटअभियंता कॉलनी परिसरातील टिटी नगरात राहणारा पक्षीप्रेमी वैभव ठाकरे याने पक्षांच्या दाण्यापाण्याची सोय केल्यामुळे त्यांच्या घराभोवती चिमण्यांचा किलबिलाट नेहमीच असतो. एखाद्या दिवशी खाद्य टाकण्यास थोडा उशीर झाला तर चिमण्या त्यांच्या दारावरसुध्दा चोची मारतात, हा अनुभव वैभवनेच व्यक्त केला. त्यांच्या घराभोवतच्या तारेवर जणु पक्ष्यांची शाळाच भरते. यामध्ये वैभवला त्याचे आई-वडील अनिल ठाकरे व संगीता ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. आपला सांस्कृतिक वारसा, जैवविविधतेत महत्त्वाचे स्थान आणि पर्यावरण संतुलनात चिमण्या महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने त्यांना वाचविण्यास प्रत्येक नागरिकांनी हिरीरीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. - यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक, अमरावती