शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्पेशालिटीत बालकांसाठी, इर्विनमध्ये म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी वॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:12 IST

अमरावती : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून लहान मुलांसाठी तसेच अलीकडच्या काळात म्युकरमायकोसिसचे ...

अमरावती : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून लहान मुलांसाठी तसेच अलीकडच्या काळात म्युकरमायकोसिसचे रुग्णही आढळत असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी दिले.

जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बालरोगतज्ज्ञ व ईएनटी तज्ज्ञांच्या सहभागासह आरोग्य यंत्रणेची ऑनलाईन बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुमीत लहाने, डॉ. महल्ले, डॉ. पाचबुद्धे यांच्यासह अनेक बालरोगतज्ज्ञ व ईएनटी तज्ज्ञ या ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते. पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, नव्याने उभ्या राहणाऱ्या अडचणींवर आपण वेळीच मात करणे आवश्यक आहे. लहान मुलांना तिसऱ्या टप्प्यात अधिक धोका असल्याची तज्ज्ञांचे मत आहे. ते लक्षात घेऊन आवश्यक उपचार सुविधा उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी सर्व उपचार सुविधांची सुसज्ज असा स्वतंत्र वॉर्ड उभारण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

सुपर स्पेशालिटीच्या ‘फेज-वन’ इमारतीत होणार वॉर्ड

त्यानुसार लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील फेज – वन इमारतीत उभारण्याचा निर्णय झाला. लहान मुलांमधील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तत्काळ हालचाली करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड

म्युकरमायकोसिस रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये आढळत आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठी सर्व सुसज्ज उपचार सुविधांसह स्वतंत्र वॉर्ड असणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्यानुसार जिल्हा रूग्णालयात स्वतंत्र वॉर्ड उभारण्याचा निर्णय झाला. लहान मुलांसाठी सुसज्ज आरोग्ययंत्रणा उपलब्ध असण्याच्या दृष्टीने बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स, तसेच म्युकरमायकोसीस आजाराचाही काही ठिकाणी आढळलेला प्रादुर्भाव पाहता ईएनटी तज्ज्ञांचाही समावेश असलेले पथक गठित करण्यात आले आहे.

मोफत उपचार

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.या आजारावरील औषध महागडे असून, त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या एक हजार रूग्णालयांमध्ये या आजाराच्या रूग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. या आजाराच्या जाणीवजागृतीबाबत मोहिम हाती घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

म्युकरमायकोसिसची लक्षणे

ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे व त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे. या आजारात नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका आढळून येतो. वेळेत उपचार झाले नसल्यास डोळे, श्वसन व मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे असते. या आजारामुळे कोरोना रूग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणा-यांनी तो नियंत्रित ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार व डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे.