शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे आगमन अन् वाळू माफियांचा दिवाळसण !

By admin | Updated: November 22, 2014 22:51 IST

विधानसभा निवडणूक संपताच मेळघाटात ‘व्हीआयपीं’चे दौरे सुरू झाले आहेत. राज्यपालांपाठोपाठ आता मुख्यमंत्री मेळघाटला भेट देणार असल्याने दौऱ्याच्या नियोजनात महसूल प्रशासन व्यस्त आहे.

महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष श्यामकांत पाण्डेय - धारणीविधानसभा निवडणूक संपताच मेळघाटात ‘व्हीआयपीं’चे दौरे सुरू झाले आहेत. राज्यपालांपाठोपाठ आता मुख्यमंत्री मेळघाटला भेट देणार असल्याने दौऱ्याच्या नियोजनात महसूल प्रशासन व्यस्त आहे. परिणामी येथील रेती तस्करांचे फावले असून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गौण खनिजांच्या चोरीला ऊत आला आहे. मुख्यमंत्र्यांचे आगमन अन् वाळू माफियांचा दिवाळसण अशीच स्थिती निर्माण झाली आहे. २९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मेळघाटलाही भेट देणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्याच्या तयारीत सध्या सर्व प्रशासकीय यंत्रणा व्यस्त आहे. महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील प्रशासनाची नुसती लगबग चालली आहे. या व्यस्त कार्यक्रमांमध्ये येथील रेती तस्करांकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या दुर्लक्षाचा पुरेपूर फायदा रेती तस्करांनी घेतला आहे. गौण खनिज तस्कर सक्रिय झाले असून मोठ्या प्रमाणात रेती तस्करीला ऊत आला आहे. सध्या रेती तस्करीचा सर्वाधिक फटका गडगा नदीला बसत आहे. या नदीपात्रातून दररोज रात्री व पहाटेच्या वेली रेतीचा उपसा सुरू आहे. नदीच्या पात्रातून रेती काढून ट्रॅक्टरमध्ये भरली जाते. नंतर ट्रॅक्टर मालकांच्या देखरेखीत ही रेती गंतव्यापर्यंत पोहोचविली जाते. मार्गातील धोक्याची चाहूल लागताच भ्रमणध्वनीद्वारे याची सूचना मालकाकडून ट्रॅक्टर चालकाला मिळते. अशा स्थितीत उचलावयाच्या पावलांची पूर्व कल्पना असल्याने चालक रेती त्याच ठिकाणी रिती करून पळ काढतात. नंतर तीच रेती पुन्हा काही वेळाने उचलून त्याची विल्हेवाट लावली जाते. या कामात सहभागी असणाऱ्यांची टोपण नावेही मोठी रोचक आहेत.