शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तिजोरीच्या चाव्या तुषार भारतीयांकडे

By admin | Updated: March 18, 2017 00:02 IST

अपेक्षेनुरुप तुषार भारतीय यांच्याकडे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या देण्यात आल्या आहेत.

महापालिका स्थायी समिती : काँग्रेसचे तीन सदस्य अनुपस्थितअमरावती : अपेक्षेनुरुप तुषार भारतीय यांच्याकडे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. भारतीय यांच्या दोन नामांकनांव्यतिरिक्त अन्य नामांकन न आल्याने तुषार भारतीय हे स्थायी समिती सभापती म्हणून अविरोध निवडून आल्याची घोषणा जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शुक्रवारी केली. १६ सदस्यीय स्थायी समिती सभागृहात भाजपकडे ९ सदस्यांचे संख्याबळ असल्याने भारतीय यांची निवड केवळ औपचारिकता होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता ही औपचारिकता पूर्ण झाली. त्यानंतर भाजपक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले. अविरोध निवड प्रक्रियेवेळी काँग्रेसच्या शोभा शिंदे, मंजुश्री ठाकरे आणि हाफिजाबी हे तीन सदस्य अनुपस्थित होते तर उर्वरित १३ सदस्य स्व.सुदामकाका देशमुख सभागृहात उपस्थित होते. स्थायी समितीत भाजपक्षाचे ९, काँग्रेसचे ३, एमआयएमचे २, शिवसेना आणि बसपचा प्रत्येकी एक सदस्य आहे.९ मार्चलाच तुषार भारतीय स्थायी समिती सभापती असतील, अशी घोषणा करण्यात आली होती. ४५ सदस्यीय भारतीय जनता पक्ष स्थायी समितीमध्ये ८ सदस्य पाठवू शकत होता. मात्र, स्थायी सभापतीपदासाठी त्यांना एका सदस्याची गरज होती. त्यापार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातून युवा स्वाभिमानच्या तीन सदस्यांपैकी सपना ठाकूर यांना स्थायी समितीत पाठविण्यात आले. ठाकूर यांच्या रूपाने भाजपच्या गोटातून नववा सदस्य स्थायी समितीत पाठविण्यात आल्याने भारतीय यांच्या सभापतीपदाचा मार्ग प्रशस्त झाला. १७ मार्चला सभापतीची निवड करण्यात यावी, असे विभागीय आयुक्तांनी कळविले. त्यानुसार जिल्हाधिकारी किारण गीत्ते सकाळी ११ वाजता स्व.सुदामकाका देशमुख सभागृहात पोहोचले. तत्पूर्वी सकाळी ९.३० ते १०.३० या कालावधीत सभापतीपदासाठी नामांकन प्रक्रिया घेण्यात आली. मात्र, या कालावधीत तुषार भारतीय यांचेच दोन नामांकन आल्याने त्यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा त्यांनी केली. महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले यांच्यासह मिलिंद चिमोटे, भाजप प्रवक्ते किरण पातुरकर, शहराध्यक्ष जयंत डेहणकर यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात.उत्पन्नाचे मर्यादित स्त्रोत असल्याने महापालिकेची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मालमत्ता करावर अधिक विसंबून न राहता उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जाईल. त्यासाठी या आर्थिक वर्षात नवे स्त्रोत शोधण्यात येतील. अमरावतीकरांना निराश करणार नाही.-तुषार भारतीय, स्थायी समिती सभापती