शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

गावागावांतील पाण्याची पातळी तपासा

By admin | Updated: March 5, 2017 00:13 IST

उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिक जाणवते. मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर भूजल सर्वेक्षण विभाग व नागरिकांच्या सहायाने पाण्याची पातळी तपासावी.

पालकमंत्री : पाणीटंचाई निवारणार्थ आढावा सभाअमरावती : उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिक जाणवते. मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर भूजल सर्वेक्षण विभाग व नागरिकांच्या सहायाने पाण्याची पातळी तपासावी. पाणीटंचाई निवारणासाठी संबंधित विभागाने सुनियोजित उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बैठकीत दिले.संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येवर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जि.प. सदस्य रवींद्र मुंदे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे, मजीप्राच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, धारणीचे प्रकल्प अधिकारी षणमुगराजन, जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी के.टी. तुमाळकर, भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी व सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांनी पाणीटंचाईची तालुकानिहाय स्थिती जाणून घेतली. नांदगाव खंडेश्वर येथील पाळा व दाभा या गावांमध्ये होणाऱ्या अशुद्ध पाणीपुरवठ्याबाबत उपाययोजना करताना पालकमंत्र्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पाणी परीक्षण करावे, असे सांगितले. पाणी शुध्दीकरणाच्या प्रक्रियेस विलंब होऊ शकतो त्यावर त्वरित उपाय म्हणून जिल्हा नियोजन योजनेच्या प्रस्तावित निधीतून नवीन पाईप जोडणी करावी, असे त्यांनी सांगितले. वीज देयके वेळेत न भरल्यामुळे पंपाने पाणीपुरवठा करण्याबाबतच्या समस्येवर तसेच विहीर अधिग्रहणाबाबतच्या समस्येवर तत्काळ उपाययोजना करावी. नवीन विंधन विहिरीचे काम त्वरित पूर्ण करावे आणि अधिग्रहित विहिरींवर सौरपंप लावण्याबाबतचे नियोजन करावे, असेही निर्देश श्री पोटे यांनी दिले.पालकमंत्री म्हणाले, नांदगाव खंडेश्वर येथे आवश्यक त्या ठिकाणी सिंचन विहिरींबाबत प्रस्ताव सादर करावा. चिखलदरा येथे १४ गावे पाणीटंचाईग्रस्त असून तेथे डिसेंबर, मार्च व जून अशा तीन टप्प्यांमध्ये विशेष नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. खंडेमल गावाचा संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गाव म्हणून समावेश होऊ शकतो, तर आवागड येथे पाणीपुरवठा योजना सुरू असल्याबाबतची माहिती त्यांनी यावेळी घेतली. मोर्शी तालुक्यातील येरला गावातील पाण्याचा पाईप जोडणी करण्याबाबत, वरूड तालुक्यात विजदेयक न भरल्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत समस्या निर्माण झाली असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत, अचलपूर तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार योजनेमध्ये प्रामुख्याने समावेश करावा आणि सौरउजेर्चा कृषिपंप उपयोगात आणून पाण्याचा प्रश्न मिटवावा, असे निर्देश त्यांनी दिले. चांदूररेल्वे तालुक्यातील मांजरखेड येथे पाण्याच्या बिकट समस्येवर मात करण्यासाठी पाच ठिकाणी सिंचन विहिरींची कामे सुरू असल्याची माहिती संबंधित गटविकास अधिकारी यांनी दिली. यावेळी कृत्रिम पाणीटंचाईवरदेखील चर्चा करण्यात आली. धामणगाव रेल्वे, तिवसा, अमरावती, दर्यापूर, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी या तालुक्यांचा आराखडा सादर करण्यात आला असून प्रथम टप्प्यात पाणीटंचाई नसल्याचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)