शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
4
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
5
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
6
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
7
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
8
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
9
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
10
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
11
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
12
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
13
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
14
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
15
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
16
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
17
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
18
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
19
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
20
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार

पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल, पालक संभ्रमात

By admin | Updated: July 4, 2015 00:47 IST

विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून २०१५-१६ काही अभ्यासक्रमातच बदल झाला आहे.

पुस्तकांचे दोन भागात विभाजन : दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी नवा प्रयोग अमरावती : विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून २०१५-१६ काही अभ्यासक्रमातच बदल झाला आहे. त्यानुसार पाचवीच्या चार विषयांना परिसर अभ्यासक्रमात दोन भाग सामावून घेतले असून, सेमी इंग्रजी माध्यमातील विज्ञान विषय मराठीतून शिकविले जाणार आहे. त्यामुळे पालकांत संभ्रम निर्माण झाला आहे. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ नुसार शिक्षण विभागातर्फे अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून एनसीआरटीईच्या शैक्षणिक प्राधिकरणाकडून आलेल्या मार्गदर्शनानुसार विषयांचा समतोल राखण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार अभ्यासक्रमातील बदल दोन वर्षांपासून करणे सुरु झाले आहे. पालकांत संभ्रमयंदापासून बदललेल्या पाचवीच्या अभ्यासक्रमात सेमी इंग्रजी माध्यमातील विज्ञान विषय मराठीतून शिकविला जाणार आहे. दहावीनंतर गणित व विज्ञान हे विषय संपूर्णपणे इंग्रजीतून असल्याने ते सेमी इंग्रजी माध्यमातून व्हावेत, असा पालकांचा आग्रह असताना विज्ञान विषय मराठीतून देण्यात आल्याने पालक संभ्रमात आहेत. शाळांमध्ये प्रवेशासाठी गेल्यानंतर हा गोंधळ उडत आहे. मात्र सहावीत सामान्य विज्ञान हा विषय स्वतंत्र राहणार असल्याने शिक्षण विभागातून सांगण्यात आले. पहिली, दुसरीचा परिसर अभ्यासक्रम बंदशिक्षण विभागाचा सुधारित विषय रचनेनुसार प्राथमिक स्तरातील पहिली व दुसरीसाठी भाषा व गणित हे विषय ठेवले आहेत. मात्र या दोन्ही वर्गांसाठी परिसर अभ्यास हा स्वतंत्र विषय ठेवलेला नाही. भाषा व गणित या विषयामध्येच परिसर अभ्यासाचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय इंग्रजी विषय अनिवार्य असेल आणि शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, कार्यानुभव हे विषयही अंतर्भूत राहणार आहेत. पाचवीच्या अभ्यासक्रमात बदलयंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सन २०१५-१६ पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल केला गेला आहे. त्यानुसार पाचवीसाठी पूर्वीचे सामान्य विज्ञान, नागरिकशास्त्र व भूगोल या विषयाची एकत्रित परिसर अभ्यास भाग-१ मध्ये एकाच रितीने मांडणी केलेली आहे. इतिहास व भूगोल हे विषय भाग-२ मध्ये एकत्रित केले आहेत. अर्थात पाच विषयांच्या पुस्तकांतील अभ्यासक्रम परिसर अभ्यासक्रम या विषयाच्या दोन टप्प्यांत सामावून घेतल्याने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे निश्चितच कमी झाले आहे. त्यामुळे या निर्णयाचे पालकांकडून स्वागत होत आहे.पाचवीसाठी पूर्वीचा अभ्यासक्रमपाचवीच्या अभ्यासक्रमात यापूर्वी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, कार्यानुभव, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण विषय होते. नवीन अभ्यासक्रमपाचवीच्या अभ्यासक्रमात यंदा झालेल्या बदलानंतर मराठी प्रथम, हिंदी व्दितीय, इंग्रजी तृतीय प्रथम हे विषय आणि त्याचबरोबर परिसर अभ्यास भाग -१, व २ गणित, कार्यानुभव, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण हे विषय समाविष्ट आहेत. पाचवीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सेमी इंग्रजी माध्यमासाठी परिसर अभ्यास भाग १ मधील सामान्य विज्ञान हा विषय इंग्रजीत तसेच भूगोल व नागरिकशास्त्र हे विषय मराठीतून शिकविणार आहेत. - शरद तिरमारे, मुख्याध्यापक.प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ नुसार यंदा पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल झाला आहे. विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र हे विषय परिसर अभ्यासक्रम १ व २ मध्ये सामावून घेतले आहेत. यानुसार पुढील वर्षी सहावीच्या अभ्यासक्रमात बदल हाईल. - पंडित पंडासने, उपजिल्हाधिकारी, प्राथमिक.