शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील बांधकाम नियमावलीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:13 IST

अमरावती : ग्रामीण भागातील ३२९४ चौरस फुटांपर्यंतच्या भूखंडावर बांधकामाला नगर रचना विभागाच्या परवानगीची गरज नाही. त्याऐवजी ग्रामस्थांना आता बांधकामासाठी ...

अमरावती : ग्रामीण भागातील ३२९४ चौरस फुटांपर्यंतच्या भूखंडावर बांधकामाला नगर रचना विभागाच्या परवानगीची गरज नाही. त्याऐवजी ग्रामस्थांना आता बांधकामासाठी काही कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे सादर करावयाची असून, विकास शुल्क आणि बांधकाम कामगार उपकर भरावयाचा आहे. नागरिकांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आहेत. परिणामी घरबांधणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात चकरा घालण्याची वेळ आता नागरिकांवर येणार नाही.

नगर विकास विभागाने जाहीर केलेल्या युनिफाईड डीसीआर (एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली) यास अनुसरून नुकताच ग्रामीण भागासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आता नव्या निर्णयानुसार बांधकामासाठी भरावयाचे विकास शुल्क हे इच्छुकांनी ग्रामपंचायतीकडे भरावयाचे असून, यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. ग्रामीण भागात होणारे विविध बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने विकास सिडको बांधकाम कामगार उपकर लागू राहील. विभागाच्या एमआरटीपी कायद्यानुसार जमीन विकास शुल्क रहिवासी प्रयोजनासाठी रेडीनेकर दराने एक टक्का असेल. बांधकाम विकास शुल्क रहिवासी प्रयोजनासाठी दोन टक्के, तर वाणिज्यसाठी रेडीरेकनर दराने चार टक्के असेल. जमीन विकास शुल्क आणि बांधकाम विकास शुल्क मिळून एकूण विकास शुल्क संबंधित ग्रामपंचायतीकडे ग्राम निधीमध्ये जमा करून घेण्यात येणार आहे. त्याची स्वतंत्रपणे नोंद ठेवण्यात यावी अशा सूचना देण्यात आले आहेत. याशिवाय बांधकाम किमतीच्या एक टक्के इतका बांधकाम कामगार उपकर असेल. हा उपकार संबंधित प्राधिकरणाकडे जमा करावा लागणार आहे.

बॉक्स

ही लागणारी कागदपत्रे

युनिफाईड डीसीआरमधील तरतुदीनुसार ३०० चौरस मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या भूखंडावरील गावठाण हद्दीतील इमारत बांधकामाकरिता ग्रामपंचायतीकडून कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक आहे. यामध्ये जागेच्या मालकीची कागदपत्रे, मंजूर ले-आऊट, बिल्डिंग प्लॅन, विकास शुल्क व कामगार उपकरासंबंधी प्राधिकरणाकडे भरल्याची पोचपावती, आर्किटेक्टचा विहित नमुन्यातील दाखला ही कागदपत्रे द्यावी लागतील.