शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

चांदुरात सिंचन व्यवस्था कोलमडली

By admin | Updated: February 5, 2016 00:19 IST

तालुक्यातील प्रकल्प ठराविक कालावधीत पूर्ण झाले असते तर शेती आणि शेतकरी यांची आज दुरवस्था झाली नसती.

पारंपरिक सिंचन धोक्यात : विलंबदेखील कारणीभूतचांदूरबाजार : तालुक्यातील प्रकल्प ठराविक कालावधीत पूर्ण झाले असते तर शेती आणि शेतकरी यांची आज दुरवस्था झाली नसती. शासनाच्या उदासीनतेमुळे तालुक्यातील सिंचन व्यवस्था पूर्णत: कोलमडली असून तालुक्यातील २४ हजार ५५० हेक्टर इतक्या क्षेत्राला फटका बसला आहे. भारत हे देश कृषिप्रधान असल्याने कृषी विकासासाठी शेतकऱ्यांच्या जीवनात सिंचनाला खूप महत्त्व आहे. परंतु आज तालुक्यातील सिंचन समस्या सर्वाधिक गंभीर झाली आहे. सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण झाले असते तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळता आल्या असत्या. ही व्यवस्था अपूर्ण असल्यामुळेच शेतकऱ्यांना नाईलाजाने आत्महत्येसारखा दुबळा मार्ग पत्करावा लागत आहे. शासन सिंचन एकीकडे कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. परंतु प्रस्तावित प्रकल्पांना अपूर्ण निधी देऊन प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी कारण नसताना वाढत आहे. परिणामी तालुक्यातील प्रकल्प रखडले आहेत. शेतीच्या पर्यायी सिंचनासाठी वापरण्यात येणारी व्यवस्था म्हणजे मध्यम व लघु सिंचन प्रकल्प होय. तालुक्यात आजच्या घटकेला ७ सिंचन प्रकल्प असून यात १ मध्यम व ६ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये पूर्णा, चारगढ, बोर्डीनाला, भगाडीनाला, करजगाव, राजुरा इत्यादी सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. यापैकी मध्यम सिंचन प्रकल्प पूर्णा व लघु सिंचन प्रकल्प चारगढ यांचे काम पूर्ण झाले असून इतर सर्वच प्रकल्पांचे काम निधीअभावी प्रलंबित आहेत. प्रशासनातील ‘झारीतील शुक्राचार्या’मुळे निधी असूनही सुधारित प्रस्तावांना मान्यता मिळत नसल्याने भूसंपादनासह इतरही कामे संथगतीने सुरू आहेत. परिणामी १० वर्षांचा कालावधी लोटूनही या प्रकल्पाची कामे रेंगाळली आहेत. तसेच नाविण्यपूर्ण असा गणोजा-बेलोरा सिंचन प्रकल्प निधीअभावी शासन दरबारी मंजुरातीसाठी वाट पाहत पडला आहे. याची सिंचन क्षमता २ हजार २०० हेक्टर इतकी आहे. तेव्हा कसा होणार तालुका सुजलाम्-सुफलाम्, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रस्तावित प्रकल्पांपैकी तालुक्यात चारगढ प्रकल्पांचे काम पूर्णत्वास आले असून प्रकल्पापासून अपेक्षित असलेले १ हजार ४८८ हेक्टर शेतजमीन ओलीताखाली आली आहे. तसेच तालुक्यात जीवनदायी ठरलेला एकमेव प्रकल्प म्हणजे पूर्णा मध्यम प्रकल्प होय. या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनसुद्धा सिंचनाची सुविधा पूर्णत: शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. या प्रकल्पाची सिंचन क्षमता ७ हजार ५३० हेक्टर इतकी असूनसुद्धा प्रत्यक्षात केवळ पाच हजार हेक्टर क्षेत्रच सिंचनाखाली आले आहे. २ हजार ५०० हेक्टर क्षेत्र अजूनही सिंचनपासून वंचित आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कालव्यापासून तर शेतापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आवश्यक असलेले पाईपलाईनचे काम निधीअभावी पूर्ण होऊ शकले नाही. या कामासाठी जलसंपदा विभागाने २०१० साली सुधारित मान्यता प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. परंतु अद्यापही हा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबितच आहे. (तालुका प्रतिनिधी)