शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागा फुगली, दर्यापुरातील हजार एकर शेती पाण्यात

By admin | Updated: July 2, 2016 23:56 IST

दोन दिवसांत झालेल्या पावसाने चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे.

दर्यापूर : दोन दिवसांत झालेल्या पावसाने चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. अचलपूर तालुक्यातील वघाळी नाल्याला आलेल्या पुराने नाल्यावरील बांध फुटल्याने व बोपापूर धरणाचे पाणी सोडल्याने चंद्रभागेतील पाण्यात अचानक भर आली. यामुळे दर्यापूर तालुक्यातील जवळपास हजारो एकर पेरणी झालेल्या नदीकाठच्या शेतजमीनीत पाणी शिरले आहे. दर्यापूर तालुक्यातील सांगवा, महिमापूर, घडा, चंद्रपूर, लांडी, शिरगव्हाण, चांदई, खेलनागवे, आराळा, माटरगाव, गौरखेडा, बेंबळा, दारापूर या १३ गावांतील नदीकाची शेतजमीन पाण्याखाली आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाची अधिकारी तहसीलदार राहूल तायडे, आपली मंडळ अधिकारी विकास पवार, राहूल चव्हाण आदींनी नुकसानग्रस्त भागात भेट दिली असून नुकसानीचा आढावा काढण्याचे आदेश कृषी सहायक व तलाठी यांना देण्यात आले आहेत. चंद्रभागा नदीला आलेल्या या अचानक पाण्याने नदीकाठची जनता घाबरुन गेली असून प्रशासनातर्फे आपली व्यवस्थापनाची संपूर्ण तयारी करण्यात आल्याचे तहसीलदार राहूल तायडे यांनी सांगितले. सन २००७ मध्ये आलेल्या पुराने दर्यापूर तालुक्यात दाहाकाट उडविला होता. त्याची पुनरावृत्ती होते की काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत. विशेष म्हणजे वाघोळी नाल्याचा बांध फुटून चंद्रभागेत पाणी वाढल्याचा तसेच धरणाचे पाणी सोडण्याचा कुठलाही संदेश प्रशसनातर्फे जारी करण्यात आला नव्हता. यामुळे निर्धास्त असलेल्या नागरिकांची घाबरगुंडी उडाली आहे. आज सकाळी चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे आधीच दुथडी भरून वाहनाऱ्या नदी नाल्यांचे बांध फुटल्याने पुराने रौद्ररुप धारण केले. शेत शिवारात पाणी शिरल्याने नुकतीच पेरलेली शेती पाण्याखाली आली आहे. नदीकाठच्या रहिवाशांना महसूल प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)चंद्रभागेला अचानक आलेल्या पुरामुळे १३ गावांतील जवळपास ४०० हेक्टर जमीन पाण्याखाली आली आहे. याबाबत आम्ही चमूसह भेट दिली असून नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश कृषी सहायक व तलाठ्यांना देण्यात आले आहेत. चंद्रभागा प्रकल्पाकडून आम्हाला सूचना न मिळाल्याने धावपळ झाली. शेतकऱ्यांचा नुकसानीचा आढावा तातडीने वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल.- राहुल तायडे, तहसीलदार, दर्यापूर