अमरावती : वातावरण बदलामुळे हवेच्या वरच्या थरात अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे, तर भूपृष्ठावरून बंगालच्या उपसागरातून येणारे वारे वाहत आहेत. राज्यात या वाऱ्याचा संगम होत असल्याने१३ ते १६ डिसेंबर दरम्यान पश्चिम मध्यप्रदेश व जिल्ह्यासह विदभार्त काही तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात हलका ते मध्म व कुठे वादळी पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.
सध्या अफगानिस्थानवर वेस्टन डिस्टबन्स ट्रफच्या आणि चक्राकार वाऱ्याच्या स्वरुपात सक्रिय आहे. आनखी दुसरे पश्चिमी चक्रवात सक्रिय होण्याची जास्त शक्यता आहे. त्याचसोबत दक्षिण शरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तसेच ४.५ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत त्याचप्रमाणे वायव्य राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रच्ाय ०.९ िकमी उंचीवर चक्रवाती वारे वाहत आहे यासर्व हवामानशास्त्रीय परिस्थितीमूळे चार दिवसात तुरळक पावसाची शक्यता आहे. चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व वाशीम जिल्ह्यात पावसाचे प्रमाण तुनात्मकरित्या कमी राहील. जळगाव, नंदूरबार जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यात आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे विर्दभात थंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.सध्याा तापमान १२ ते १४ अंशाचे दरम्यान राहील तर १४ नंतर त्यापेक्षा कमी येणार असल्याचे बंड यांनी सांगितले.
बॉक्स
आंब्याचा बहराला धोका
ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आंब्याला बहर फुटण्याला सुरुवात झालेलि आहे. ढगाळ वातावरणात आद्रर्ता वाढल्याने पुढिल तीन ते चार दिवस आंब्याकरीता धोकादायक आहेत. या वातावरणामुळे किड व रोगांचा प्रादुभार्व होवून बहर जळू शकतो.तातडीने निंबोळी अकार्सारखे कीटकनाशक सोबतच बुरशीनशकाची पवारणी महत्वाची आहे. यासोबतच हरभरा व तुरीवर शेंगा व गाडे पोखरणाऱ्या अलीचा प्रादुभार्व होण्याची शक्यता आहे.