शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘विशाखा’समोर सिद्धतेचे आव्हान

By admin | Updated: May 24, 2017 00:12 IST

महापालिकेतील कर्मचारी महिलेचा ‘मानसिक छळ’ प्रकरणात विशाखा समितीसमोर निष्कर्षाच्या सिद्धतेचे आव्हान राहणार आहे.

‘सदार’ प्रकरण : बुधवारी महापालिकेत बैठकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेतील कर्मचारी महिलेचा ‘मानसिक छळ’ प्रकरणात विशाखा समितीसमोर निष्कर्षाच्या सिद्धतेचे आव्हान राहणार आहे. यासंदर्भात २४ मे रोजी ‘विशाखा’ समितीची बैठक होवू घातली आहे. राजापेठ उड्डाण पूल प्रकल्पाच्या विवक्षित कामाची जबाबदारी असलेल्या जीवन सदार या सेवानिवृत्त अभियंत्याच्या बाबतीत हे प्रकरण आहे.आयुक्तांनी याबाबत १६ मे रोजी काढलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमिवर या फाईलवरील धुळ नव्याने झटकली गेली आहे. विशाखा समितीनेही दखल घेतल्याने संबंधित महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळण्याचे सुसंकेत आहेत.आयुक्तांच्या आदेशानुसार, अतिरिक्त शहर अभियंता या पदाचा प्रभार असलेल्या जीवन सदार यांच्याविरूद्ध संबंधित महिलेला फौजदारी करण्याची मुभा मिळाली आहे. तथापि या प्रकरणातील पुरावे हेतुपुरस्सरपणे नाहीसे करण्यात आले. या विशाखा समितीच्या भाष्यावर आयुक्तांनी समिती अध्यक्षांकडून खुलासा मागितला आहे. यासंदर्भात उपायुक्त प्रशासन महेश देशमुख यांच्या स्वाक्षरीने १९ मे रोजी समिती अध्यक्षांना पत्र देण्यात आले असून त्यांना प्रशासनाकडे खुलासा द्यायचा आहे. सीसीटीव्ही फुटेज हेतुपुरस्सरपणे नाहीसे करण्यात आले. अन्य सर्व दिवसांचे फुटेज सामान्य प्रशासन विभागात उपलब्ध असताना नेमके २० ते २६ मे २०१६ या कालावधीतील रेकॉर्ड उपलब्ध नव्हते. यावरून हेतुपुरस्सरपणे ते रेकॉर्ड नष्ट करण्यात आले, असा निष्कर्ष समितीने काढला आहे.बांधकाम विभागातील ते फुटेज असल्याचे समितीचे म्हणणे आहे. याबाबत आता नव्याने जीएडीला विचारणा केली जाणार असून त्या विशिष्ट दिवसांचेच रेकॉर्ड उपलब्ध नसल्याबाबत जीएडीकडून खुलासा मागवला जाईल. याशिवाय टेलिफोनिक संवादही नव्याने तपासला जाईल. आयुक्तांच्या आदेशानंतर या चौकशीने वेग घेतला आहे. शिवाय कारवाईत ढवळाढवळ केल्याचा आरोप असलेल्या बांधकाम विभागातील ‘त्या’ कनिष्ठ लिपिकाची चौकशीही प्रस्तावित केली जाणार आहे. एकंदरीतच या प्रकरणाची फाईल नव्याने उघडण्यात आल्याने विशाखा समितीसमोर त्यांनीच काढलेल्या निष्कर्षाची सिद्धता करण्याचे आव्हान आहे. विशाखा समितीने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित महिलेला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांची बदली का?जीवन सदार यांनी आपला मानसिक छळ चालविल्याची तक्रार एका महिलेने मार्च २०१६ मध्ये केली होती. विशाखा समितीची चौकशी सुरू असतानाच ‘त्या’ महिलेची अन्य विभागात बदली करण्यात आली. या प्रकरणातील गैरअर्जदारावर कुठलीही कारवाई न करता उलटपक्षी फिर्यादी महिलेवर बदलीची कारवाई करण्यात आली. या कारवाईबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.संबंधित प्रकरणाबाबत खुलासा मागविणारे पत्र मला प्राप्त झाले. यासंदर्भात बुधवारी विशाखा समितीची बैठक होवू घातली आहे. त्यात भाष्य व खुलाशाबाबत चर्चा होईल.- सुषमा ठाकरे, अध्यक्ष, विशाखा समिती