शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

एसटीच्या महिला वाहकावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 22:15 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : आईला एसटीतून उतरून दिल्याच्या कारणावरून मुलाने एसटीच्या महिला वाहकावर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना मंगळवारी माहुली जहागीर बसस्थानकावर घडली. कविता गावंडे (३०, रा. अमरावती) असे जखमी महिला वाहकाचे नाव आहे. याप्रकरणात माहुली पोलिसांनी आरोपी कमलेश सावरकर नामक तरुणाला अटक केली आहे.अमरावती आगाराची एसटी बस क्रमांक एमएच ४०-२३०० दाभेरी ...

ठळक मुद्देमाहुलीतील घटना : आरोपी कमलेश सावरकरला अटक

आॅनलाईन लोकमतअमरावती : आईला एसटीतून उतरून दिल्याच्या कारणावरून मुलाने एसटीच्या महिला वाहकावर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना मंगळवारी माहुली जहागीर बसस्थानकावर घडली. कविता गावंडे (३०, रा. अमरावती) असे जखमी महिला वाहकाचे नाव आहे. याप्रकरणात माहुली पोलिसांनी आरोपी कमलेश सावरकर नामक तरुणाला अटक केली आहे.अमरावती आगाराची एसटी बस क्रमांक एमएच ४०-२३०० दाभेरी जात असताना एक महिला प्रवासी नांदगाव पेठ बसस्थानकावरून बसली. त्या महिलेने तिकीट घेण्यावरून महिला वाहक कवितासोबत वाद केला. वाद विकोपाला जात असल्याचे पाहून कविता यांनी त्या महिलेस नांदगावपेठच्या पेट्रोल पंपाजवळ उतरून दिले. त्यानंतर एसटी दाभेरीकडे रवाना झाला. दरम्यान त्या महिलेने मुलगा कमलेशला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.अमरावती बसस्थानकावर चक्काजामकमलेशने माहुली बसस्थानकावर अमरावती-दाभेरी बस थांबताच वाहक कवितावर चाकुहल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्याने गोंधळ उडाला. कविता यांना तत्काळ माहुलीच्या येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्या हाता-पायावर चाकूच्या गंभीर जखमा झाल्या होत्या. उपचारानंतर कविता यांनी माहुली पोलिसांकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी कमलेश सावरकरविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ३५२ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. दरम्यान, महिला वाहकावर हल्ला झाल्याची माहिती अमरावती मध्यवर्ती बसस्थानकातील चालक-वाहकांना मिळताच त्यांनी बसस्थानकात चक्काजाम केले. यावेळी कोतवाली पोलिसांनी पाचारण केले. पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्यासह ताफ्याने आंदोलकांना शांत केले. त्यानंतर एसटी बसचे आवागमन पूर्वरत झाले.महिला वाहकाच्या तक्रारीवरून आरोपी कमलेश सावरकरविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्याला ताब्यात घेतले आहे. तिकीट घेण्यावरून एका महिला प्रवासी व वाहक यांच्यात वाद झाला. तिला एसटीतून उतरवून देण्यात आले. माझा आईला बसमधून का उतरविले, या कारणावरून कमलेशने चाकुहल्ला केल्याचे चौकशीत पुढे येत आहे.विजय राठोड,ठाणेदार, माहुली जहागीर.