शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जयश्रीला न्याय देण्याची महिला आयोग अध्यक्षांची ग्वाही

By admin | Updated: July 31, 2016 00:02 IST

एक दिवसीय अमरावती दौऱ्यावर आलेल्या राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शुक्रवारी रात्री ९ वाजता इर्विनमध्ये दाखल असलेल्या जयश्री दुधेच्या प्रकृतीची आत्मियतेने चौकशी केली.

पोलिसांची बैठक घेणार : सासरच्यावर कारवाई करण्याचे आश्वासनअमरावती : एक दिवसीय अमरावती दौऱ्यावर आलेल्या राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शुक्रवारी रात्री ९ वाजता इर्विनमध्ये दाखल असलेल्या जयश्री दुधेच्या प्रकृतीची आत्मियतेने चौकशी केली. जयश्रीच्या सासरच्या मंडळीवर कठोर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. या प्रकरणासंदर्भात माहूर पोलिसांची बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पतीच्या मृत्यूनंतर कुऱ्हा येथील माहेरवासिनी जयश्री दुधेवर माहूर येथील सासरच्या मंडळींनी अनन्वीत अत्याचार केलेत. इर्विन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे. यासंदर्भात 'लोकमत'ने वृत्तातून पाठपुरावा केल्यानंतर ती वार्ता राज्यभरात पसरली. जयश्रीच्या अत्याचाराला वाचा फुटल्याने प्रशासकीय यंत्रणेने दखल घेतली. शुक्रवारी राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी जयश्री दुधेला भेट दिली. तिची विचारपूस करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करू तसेच नांदेड येथील पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून सासरच्या मंडळीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी जयश्रीला दिले. राज्य महिला आयोगातर्फे या अत्याचार प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात करून न्याय देण्यात येईल, अशी ग्वाही रहाटकर यांनी जयश्रीसह तिच्या कुटुंबीयांना दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक तितरे, अधिसेविका मंदा गाढवे, भाजपाचे दिनेश सुर्यवंशी, जंयत डेहनकर यांच्यासह सुरेखा लुंगारे, सुधा तिवारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)समाजसेवी मनीष पोकळे घेतोय काळजीसमाजसेवेच्या उद्देशाने शहरातील मनीष पोकळे नामक युवक जयश्रीची काळजी घेण्यासाठी सरसावला आहे. तो दररोज इर्विनमध्ये जाऊन जयश्री व तिच्या आई-वडिलांना भेट घेऊन मदतीचा हात देत आहे. त्यांना काही लागल्यास तत्काळ मदत देत आहे.