शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंचा वीज कंपनीला ‘शॉक’

By admin | Updated: June 24, 2016 00:37 IST

तालुक्यातील सर्वच विभागांचा योजनानिहाय आढावा घेण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी स्थानिक तहसील कार्यालयात ....

आढावा बैठक गाजली : कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्याच्या सूचना चांदूरबाजार : तालुक्यातील सर्वच विभागांचा योजनानिहाय आढावा घेण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी स्थानिक तहसील कार्यालयात विभाग प्रमुखांना बुधवार २२ जून रोजी बोलावले होते. या बैठकीत उपस्थित शेतकरी व नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या ‘फेस टू फेस’ तक्रारी दाखल केल्यामुळे आमदारांनी वीज कंपनीची अक्षरश: झाडझडती घेतली. तक्रारकर्त्यांची कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देष देऊन संबंधित कत्राटदारावर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची सूचनाही वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. २० मिनटे वीज कंपनीला धारेवर धरल्यामुळे आ. कडू यांनी वीज कंपनीचे सर्किट ‘शॉट’ केल्याचे दिसून आले. तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या विद्युत जोडणीसाठी अर्ज दिले आहेत. परंतु त्यांना अजूनपर्यंत वीज जोडणी देण्यात आली नाही. सुरळी येथील राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याला त्वरित वीज जोडणीकरिता कंत्राटदाराकडून पैशाची मागणी झाली. त्याप्रमाणे संबंधी शेतकऱ्याने सहा हजार रुपये नगदी कंत्राटदारास दिले. पुन्हा ७ हजार रुपयाची मागणी कंत्राटदाराने केली. या प्रकरणात आ. कडू यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांच्याकडे कोणतेही उत्तर उपलब्ध नव्हते. विविध विभागांचा विभाग नहाय आढावा घेताना शेतकऱ्यांच्या सावकारी कर्जाच्या प्रकरणाबाबत उपनिबंधकांच्या वेळकाढू धोरणाचा समाचार घेतला. शासन शेतकऱ्यांना सावकारीच्या जोखडातून सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना तुम्ही शेतकऱ्यांची बाजू शासनासमोर का मांडत नाही, असा प्रश्न करून उपनिबंधकांना आमदारांनी नि:शब्द केले. या बैठकीला तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. त्यांच्या विकास कामांबाबतच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन आमदारांनी यावेळी सरपंचांना दिले. तसेच ग्रामपंचायत हद्दीत येणारे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा ठराव ग्राम पं. घेऊन त्याची प्रत पंचायत समिती व प्रहार कार्यालयाकडे पाठवावी, असे सूचित केले. या बैठकीला तहसीलदार शिल्पा बोबडे, नायब तहसीलदार गजानन पाथरे, हरीश राठोड, सैफन नदाफ यांचेसह वीज कंपनीचे सहायक अभियंता चुटे, जलयुक्त शिवारचे अभियंता पाटील, कृषी अधिकारी बिजवे, गटविकास अधिकारी कनाटे, पंचायत समिती उपसभापती राजेश सोलव, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब वाकोडे, मंगेश देशमुख व दीपक भोंगाडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)