शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंचा ई-मेल हॅक, अभियंत्याला ७६ हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:15 IST

अमरावती : पाठविलेला मेल कंपनीच्या सीईओंचा असल्याचे भासवून त्या कंपनीत काम करणाऱ्या अभियंता तरुणाला ७६ हजार २०० रुपयांचा ऑनलाईन ...

अमरावती : पाठविलेला मेल कंपनीच्या सीईओंचा असल्याचे भासवून त्या कंपनीत काम करणाऱ्या अभियंता तरुणाला ७६ हजार २०० रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. १८ ऑगस्ट रोजी रात्री ७.३८ ते ९ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी ओमप्रकाश रामदास ठाकरे (२५, रा. जवळापूर, ता. अचलपूर) यांच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ओमप्रकाश ठाकरे हा तरुण हैद्राबाद येथील कंपनीत कार्यरत आहे. मात्र एक वर्षापासून त्याचे ‘वर्क फ्राॅम होम’ सुरू आहे. १८ ऑगस्ट रोजी ओमप्रकाशला कंपनीचे सीईओ वासू सत्यपल्ली यांच्या नावाने त्यांच्याच ई-मेलवरून एक ईमेल आला. ७६ हजार २०० रुपये कंपनीच्या व्हेंडरला भरायची आहे, असे त्यात नमूद होते. तो ईमेल आपल्याच कंपनीच्या सीईओंचा असल्याचे समजून ओमप्रकाशने फोन-पेवरून ३१ हजार १०० व ४५ हजार १०० रुपये हुबळी (कर्नाटक) येथील खात्यावर पाठविले. रक्कम पाठविल्याची माहिती त्याने सीईओंसह व्हॉटस्ॲप ग्रुपवर शेअर केली. त्यावेळी कंपनीच्या सीईओंकडून असा कुठलाही इमेल पाठविण्यात आला नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ग्रुपवर खातरजमा केल्यानंतर ही फसवणूक उघड झाल्याची माहिती पथ्रोटचे ठाणेदार सचिन जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली.

केवायसीच्या नावावर १.३९ लाखांचा गंडा

वलगाव रोडवरील पॅराडाईज काॅलनीत राहणाऱ्या वहीद खुशमुद अली यांना सिमकार्ड केवायसी व्हेरिफिकेशन पेंडिंग असल्याची बतावणी करण्यात आली. मॅसेज पाठवून टीम व्हिवर हा ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यामाध्यमातून त्यांच्या खात्याची सर्व माहिती मिळवून खात्यातून चक्क १ लाख ३९ हजार १० रुपये परस्पर विड्रॉल करण्यात आले. २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.११ ते ४.२० या एक तासाच्या कालावधीत ही फसवणूक झाली. सायबर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.

कोट

केवायसी अपडेशन, क्युआर कोड स्कॅन करायला लावून ऑनलाईन गंडा घातल्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. मोबाईलधारकाने ॲनीडेस्क, टिमव्युव्हर हे अप्लिकेशन डाऊनलोड करू नये. ओटीपी, एटीएम कार्डचा क्रमांक, पीन कुणाशीही शेअर करू नका.

- सीमा दाताळकर,

पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे