शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती कारागृह झाले कोराेनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:13 IST

अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृह कोराेना संक्रमणापासून मुक्त झाले आहे. आजमितीला एकही कैदी पॉझिटिव्ह नसल्याची नोंद करण्यात आली आहे. ...

अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृह कोराेना संक्रमणापासून मुक्त झाले आहे. आजमितीला एकही कैदी पॉझिटिव्ह नसल्याची नोंद करण्यात आली आहे. गत आठवड्यात दोन कैदी कोरोना संक्रमित होते, पण आता तेसुद्धा निगेटिव्ह आहेत. कोरोना नियमावलींचे कठोर पालन केल्यामुळे कारागृह कोरोनामुक्त झाले आहे.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात ३१ मेपर्यंत कठोर संचारबंदी लागू आहे. कोरोना संक्रमित रुग्ण, मृत्युसंख्या दरदिवशी वाढत आहे. मात्र, येथील मध्यवर्ती कारागृहाने कोरोना नियमावलींचे काटेकोर पालन करून कोरोना नियंत्रणात आणला आहे. हल्ली कारागृहात एकही कैदी संक्रमित नाही. होमगार्डच्या विभागीय कार्यालयात आयसोलेटेड कैदीसुद्धा नाहीत.

मध्यवर्ती कारागृहात महिला व पुरुष असे ११५० च्यावर कैदी बंदिस्त आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कारागृहातील ६८ कैदी व कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले होते. मात्र, एप्रिलपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असताना, कारागृहात कोरोना नियंत्रणात आणला आहे. कैद्यांची नियमित आरोग्य तपासणी, मास्कचा वापर, शारीरिक सुरक्षित अंतर आदी नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. त्यामुळे आजमितीला ११५० कैदी संख्या असताना एकही कैदी कोरोना संक्रमित नाही, ही बाब जमेची ठरणारी आहे. पहिल्या लाटेत एक कर्मचारी व एक कैदी कोरोनाचा बळी ठरला होता. त्यानंतर कारागृहात कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. नियमित आरोग्य तपासणीदरम्यान ताप, खोकला, सर्दीचे रुग्ण आढळल्यास औषधोपचार केला जातो. होमगार्ड कार्यालयात साकारण्यात आलेल्या कोविड केअर केंद्रात संक्रमित कैद्यांवर उपचार होत असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी एस.आय. थोरात यांनी दिली.

------------------

नवीन कैदी १४ दिवस क्वारंटाईन

न्यायालयाच्या आदेशानुसार, कारागृहात पाठविल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन कैद्याला तात्पुरत्या कारागृहात १४ दिवस क्वारंटाईन नियमावली अनिवार्य आहे. त्यामुळे थेट कारागृहात नवीन कैद्यांची कोरोना चाचणी झाल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही तसेच नियमित आरोग्य तपासणीमुळेसुद्धा कैदी कोरोना संसर्गापासून लांब राहत असल्याचे वास्तव आहे.

---------------

गत आठवड्यात ३० कैद्यांची आकस्मिक ॲन्टिजेन चाचणी केली असता, एकही संक्रमित आढळून आले नाही. कठाेर नियमांचे पालन हेच कारागृहातील कोरोनामुक्तीसाठी लाभदायक ठरले आहे.

- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती.