शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रामनवमी उत्साहात साजरी

By admin | Updated: April 16, 2016 00:13 IST

शहरासह बडनेरा येथे रामनवमी उत्सव थाटात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

भाविकांची मांदियाळी : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनअमरावती/बडनेरा : शहरासह बडनेरा येथे रामनवमी उत्सव थाटात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. शहरातील अंबापेठ जवळील श्रीराम मंदिर ट्रस्टच्यावतीने प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्सवात शुक्रवारी साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजता दरम्यान मोठ्या पाळण्यात श्रीरामाची प्रतिमा ठेवून हजारो भक्तांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सव साजरा झाला. शुक्रवारी सकाळी प्रभू श्रीरामाचा अभिषेक करण्यात आला. पांडूरंग वजूरकर यांनी ग्रंथवाचन केले. तर यावेळी विनोद कोलवाडकर यांचे कीर्तन झाले. यानंतर आरती व श्रीरामाच्या नावाचा जयघोष व गजर करण्यात आला. प्रसादाचेही वाटप करण्यात आले. सकाळपासूनच अंबानगरीतील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय आळशी, प्रकाश देशपांडे, शैलेश जोग, मोहन अग्रवाल, प्रज्ञा देशपांडे यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. अंबापेठेतील श्रीराम मंदिर हे ११८ वर्षांपूर्वी श्रीरंग आळशी यांनी स्थापन केले. उत्तर दिशेला प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीतेची सुंदर व देखणी मुर्ती आहे. समोर हनुमंताची मूर्ती आहे. संपूर्ण मंदिर सागवानी धाटणीचे आहे.बडनेरा शहरातील विविध ठिकाणच्या श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. रामनामाच्या गजराने शहर दुमदुमून गेले होते. जुन्या वस्तीतील गोडबोले यांच्या राम मंदिरात हभप रमेश गोडबोले यांचे राम जन्माचे कीर्तन झाले. तर वाकेकर यांच्या श्रीराम मंदिरात हभप महादेवबुवा बडनेरकरांचे कीर्तन पार पडले. तसेच नव्या वस्तीत देखील यवतमाळ मार्गावरच्या राम मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. राम जन्मोत्सवाच्या वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. प्रत्येक राम मंदिरात राम जन्माचा पाळणा गीते म्हणण्यात आली. रामनामाचा जयघोष आरती, भजने म्हणण्यात आली. प्रसादाचे वाटप करण्यात आले. सर्वच मंदिरामध्ये भाविकभक्तांची मोठी गर्दी उसळली होती. रामनामाच्या गजराने शहर दुमदुमून गेले होते. तसेच शोभायात्रा काढण्यात आली. (प्रतिनिधी)