शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची करडी नजर

By admin | Updated: June 5, 2014 23:42 IST

पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस भरती प्रक्रियेला शुक्रवार (ता.६) पासून प्रारंभ होणार आहे. यासाठी शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात

अमरावती : पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.  पोलीस भरती प्रक्रियेला शुक्रवार (ता.६) पासून प्रारंभ होणार आहे. यासाठी शहरात  पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर व ग्रामीण पोलीस भरतीसाठी एकूण १६ हजार ६७२ उमेदवार रिंगणात उतरणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान कुठलाही घोळ होऊ नये यासाठी भरती घेण्यात येणार्‍या सर्व प्रांगणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. या कॅमेर्‍यांची भरती प्रक्रियेवर करडी नजर राहणार आहे.प्राप्त माहितीनुसार, शहर पोलीस आयुक्तालयासाठी घेण्यात येणार्‍या भरती प्रक्रियेत ९0 रिक्त पदांसाठी  २ हजार १४0 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. यात ४00 महिला व १ हजार ७४0 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये २५0 रिक्त पदांसाठी १४ हजार ४३२ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये २ हजार ६0२ महिला व ११ हजार ८३0 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेत ३0 टक्के महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. शहर पोलिसांसाठी घेण्यात येणारी भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय, विद्यापीठ व ग्रामीण पोलिसांसाठी घेण्यात येणारी भरती प्रक्रिया जोग स्टेडीअम व राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रांगणात होणार आहे. पोलीस मुख्यालय व जोग स्टेडीअमच्या  प्रांगणात १00 मीटर दौड, गोळा फेक, पुल-अप, लाँग जम्प व राज्य राखीव पोलीस दल व विद्यापीठाच्या प्रांगणात ५ मीटर दौड घेण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेला पहाटे ५ वाजतापासून प्रारंभ होणार असून उमेदवारांनी दिलेल्या वेळेनुसार भरती प्रक्रियेला उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दररोज हजारो उमेदवारांची चाचणीशहर व ग्रामीण पोलीस भरती प्रक्रीयेला शुक्रवारपासुन प्रारंभ होणार आहे. यासाठी शहर पोलीस भरतीसाठी दररोज ४00 व ग्रामीण पोलीस भरतीकरिता १ हजार उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात आले आहे. यामध्ये उमेदवारांच्या सत्य प्रती पाहून त्यांचे रजीस्ट्रेशन, छाती,  उंची मोजण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण पोलीस भरती देणार्‍या पुरुष  उमेदवारांची शाररीक चाचणी करण्यात घेण्यात येईल. ग्रामीणसाठी आलेल्या महिला उमेदवारांची शारीरिक चाचणी २0, २१ व २३ जून रोजी घेण्यात येईल. शहर पोलीस भरती देणार्‍या पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी  १२ ते १५ जून व महिला उमेदवारांची शारीरिक चाचणी १६ जून रोजी घेण्यात येणार आहे.