शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती, बडनेरा स्थानकांवर सीसीटीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:16 IST

रेल्वे स्थानकावर होणाºया घातपाती कारवाया, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आता बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. भुसावळ मध्य रेल्वे प्रबंधकांकडे त्याअनुषंगाने ८० कॅमेरे मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे८० कॅमेऱ्यांचा प्रस्ताव : स्टेशन प्रबंधक, रेल्वे सुरक्षा दलाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे स्थानकावर होणाºया घातपाती कारवाया, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आता बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. भुसावळ मध्य रेल्वे प्रबंधकांकडे त्याअनुषंगाने ८० कॅमेरे मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.रेल्वे प्रवाशांना अधिकाअधिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रबंधकांनी घेतला आहे. यात अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. येत्या अर्थसंकल्पात रेल्वे गाड्या आणि स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत लागणारा निधी मंजूर होईल. मात्र, तत्पूर्वी मध्य रेल्वे मुंबई प्रशासनाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेल्वे स्थानकांचा सीसीटीव्ही बसविण्याबाबत लेखाजोखा मागविला आहे. दर दिवसाला प्रवाशांची मोठ्या संख्येने वाहतूक होत असलेल्या रेल्वे स्थानकांवरच सीसीटीव्ही बसविणे प्रस्तावित आहे. त्यानुसार अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे स्थळ निश्चित करण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा दलाने पाठविलेल्या प्रस्तावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे स्थळ वरिष्ठांना अहवालाद्वारे कळविले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.या वर्दळीच्या ठिकाणी लागतील कॅमेरेअमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार, तिकीट आरक्षण केंद्र, पादचारी पूल, प्लॅटफार्म, पार्सल कार्यालय, स्टेशन प्रबंधकांचे कार्यालय, कॅन्टीन, वाहक-चालकांचे विश्रामगृह परिसर, चालक लॉबी, वाहनतळ, रेल्वे पोलीस ठाणे, रेल्वे रूळ परिसर आदी वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.वरिष्ठांच्या पत्रानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावर एकूण ८० कॅमेºयांची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव पाठविला आहे.- सी. एच. पटेल, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, बडनेरा