शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना आता पाच ऐवजी सहा विषय

By admin | Updated: March 17, 2017 00:12 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पाच ऐवजी सहा विषयांची

 अमरावती : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पाच ऐवजी सहा विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे. नेहमीच्या पाच विषयांच्या जोडीने व्होकेशनल विषयाचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. सन २०१७-१८ याशैक्षणिक सत्रापासून यानिर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. सध्या सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम आणि द्वितीय भाषा, विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र याविषयांची परीक्षा द्यावी लागते. पुढील शैक्षणिक सत्रापासून परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. यंदाच्या सत्रापासून व्होकेशनल या सहाव्या विषयाची परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्यांतर्गत सीबीएसईने हा बदल केला आहे. विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या तीनपैकी एका विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास सहाव्या विषयाचे गुण ‘टॉप ५’मध्ये गृहित धरण्यात येतील. मात्र, अनुत्तीर्ण झालेल्या विषयाची पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध असेल. परीक्षेतून ४१ विषय वगळले अमरावती : प्रत्येक विषयासाठी १०० गुण राहणार असून त्यापैकी ५० गुण बोर्डाच्या लेखी परीक्षेसाठी तर उर्वरित ५० गुण प्रात्यक्षिक परीक्षांसाठी दिले जातील, असे सीबीएसईने जाहीर केले आहे. सहावा वैयक्तिक विषय निवडण्यासाठी एकूण १३ पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. दहावीच्या तंत्रज्ञान, सुरक्षा, आॅटोमोबाईल तंत्रज्ञान, पर्यटन आदी विषयांचा समावेश राहणार आहे. ऐच्छिक म्हणून गणले जाणारे तब्बल ४१ विषय सीबीएसईने वगळले आहेत. या विषयांकरिता अत्यंत कमी संख्येने विद्यार्थ्यांची नोंदणी होत असल्याने हे विषय अभ्यासक्रमातून वगळण्यात आले आहेत. पुढील शैक्षणिक सत्रापासून हा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)