शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

गुरांचा बाजार सोशल मीडियावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:13 IST

आसेगाव पूर्णा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आठवडी बाजार बंदच आहेत. ...

आसेगाव पूर्णा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आठवडी बाजार बंदच आहेत. त्यामुळे शेतकरी आता गुरांची खरेदी-विक्री सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहेत. सोशल मीडियावर आपल्या जनावरांचे फोटो टाकून त्याखाली आपला मोबाइल क्रमांक दिला जातो. ज्या शेतकऱ्यांना जनावरांची खरेदी करायची आहे, त्यांनी मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन केले जाते. त्यामुळे सोशल मीडियावरही आता गुरांची खरेदी-विक्री होताना दिसत आहे.

खरीप हंगाम महिनाभरावर आल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे गुरांचा बाजार बंद आहे. त्यामुळे बैलांची खरेदी- विक्री बंद झालेली आहे. परिणामी वर्षभरात एक कोटीची होणारी उलाढाल ठप्प झाल्याने बैलांद्वारे केली जाणारी शेती मशागतीची कामे अडचणीत सापडली आहेत. हवामान खात्याने यंदा मान्सून हा जूनच्या १ तारखेला धडकणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आसेगावासह परिसरातील शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. सद्यस्थितीत शिवारात ट्रॅक्टरद्वारे नांगरणीच्या कामांना वेग आला आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत असल्याचे दिसून येते. शेतकरी बैलांच्या साह्याने यंदा मशागतीची कामे करण्यास प्राधान्य देत आहे. एप्रिल व मे महिन्यांत बैलजोडी खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असताना मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलबाजार बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही शेतकरी वैयक्तिक स्तरावर बैलांचा शोध घेत आहेत. अशातच बैलांचे भावदेखील प्रचंड वाढले आहेत.

कोट

दोन-तीन वर्षांपासून नापिकी होत असल्यामुळे चाराटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे दूध व्यवसायाची जनावरे विक्री केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय उरलेला नाही. विक्री व खरेदी करण्याकरिता बैलबाजार पेरणीच्या तोंडावर खुला करण्यात यावा.

- राजेंद्र नवले, शेतकरी, हिवरा पूर्णा

कोट २

दोन-तीन एकर शेती असणाऱ्यांना यंत्राच्या साह्याने शेती करणे परवडत नाही. त्यामुळे बैलजोडीशिवाय लहान शेतकऱ्यांना पर्याय नाही. मात्र, लॉकडाऊनमुळे बैलबाजार बंद असल्याने बैलजोडी खरेदी-विक्री करण्याकरिता पेच निर्माण होत आहे.

- योगेश कोळस्कर, शेतकरी, आसेगाव पूर्णा