शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्यांच्या वडिलांना जातिवाचक शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

धारणी : तालुक्यातील झापल ग्रामपंचायतमध्ये १६ फेब्रुवारी रोजी सरपंचपदाची निवडणूक प्रस्तावित होती. ती होण्यापूर्वी गावातील विशिष्ट ...

धारणी : तालुक्यातील झापल ग्रामपंचायतमध्ये १६ फेब्रुवारी रोजी सरपंचपदाची निवडणूक प्रस्तावित होती. ती होण्यापूर्वी गावातील विशिष्ट समाजातील नागरिकाने एका महिला सदस्याच्या वडिलांना जातिवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात निवडणूक घेण्यात आली.

तालुक्यातील झापल ही गटग्रामपंचायत असून, त्यात शेजारच्या बारू, जुतपाणी, टोली या गावांचा समावेश आहे. तेथे मंगळवारी सरपंचपदाची निवडणूक होती. झापल गावातीलच साजिद खा गुडे खा याच्या नेतृत्वातील पॅनेल ग्रामपंचायतीवर निवडून आले आहे. त्याच्या पॅनलमधील माणकू जावरकर या महिला सदस्याला तो सरपंच बनविणार होता. यादरम्यान रविवारी सायंकाळी ७ वाजता तो गावातीलच अविरोध निवडून आलेल्या विरोधी पक्षाच्या महिला सदस्याच्या घरी गेला. तेथे त्या महिला सदस्याआ माणकू जावरकरलाच मतदान कर, असे धमकावले. त्यावर तिने योग्य निर्णय घेईन, असे बजावले. त्याने त्या महिला सदस्याला शिवीगाळ केली तसेच तिच्या वडिलांनासुद्धा जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली, अशी तक्रार सदस्याच्या पित्याने धारणी पोलिसांत रविवारी रात्री तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून साजिद खा गुडे खा याच्याविरुद्ध धारणी पोलिसांनी कलम ३२४, २९४ व अ‍ॅट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर मंगळवारी पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.