शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कारचा भीषण अपघात पिता ठार, माता-पुत्र गंभीर

By admin | Updated: June 5, 2014 23:41 IST

कारच्या भीषण अपघातात पिता ठार झाल्याची घटना गुरुवारी शिरखेड पोलीस ठाण्यांतर्गत सावरखेड- गोराळा फाटा येथे घडली. मोहन गीरधर नागरेचा(५0) असे मृताचे नाव आहे.

बघ्यांची गर्दी : सावरखेडा येथील घटनामोर्शी : कारच्या भीषण अपघातात पिता ठार झाल्याची घटना गुरुवारी शिरखेड पोलीस ठाण्यांतर्गत सावरखेड- गोराळा फाटा येथे घडली. मोहन गीरधर नागरेचा(५0) असे मृताचे नाव आहे. अपघातात मोहन यांची पत्नी हिना मोहन नागरेच्या (४५) व त्यांचा मुलगा रक्षक मोहन नागरेच्या (२१) हे दोघे गंभीर जखमी झाले. मोहन नागरेच्या हे जुनी वस्ती बडनेरा येथे मेडिकल चालवीत होते. ते शुक्रवारी पत्नी हिना व मुलगा रक्षक यांच्यासह त्यांच्या एम. एच. ३३ ए २३४७  क्रमांकाच्या फोर्ड फीगो कारने विवाह समारंभाच्या कार्यक्रमासाठी मोर्शी येथे गेले होते. तेथून दुपारी ३ वाजता ते अमरावतीकडे परतीच्या प्रवासाला निघाले. दरम्यान सावरखेड -गोराळा मार्गाने अमरावतीकडे जाणार्‍या एका टेम्पो ट्रॅव्हल्स चालकाने त्यांच्या कारला मागून जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये कार रस्ताच्या कडेला असणार्‍या एका शेतात जाऊन पलटी झाली. यात मोहन, हिना व रक्षक हे तिघे गंभीर जखमी झाले. या घटनेकडे तेथील काही नागरिकांचे लक्ष जाताच त्यांनी नागरेच्या कुटुंबीयांना कारमधून बाहेर काढुन त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी मोहन यांना मृत घाषित केले. हिना व रक्षक यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरु होती. (प्रतिनिधी)