शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ परिसरातील ‘तो’ बिबट ट्रॅप कॅमेऱ्यात कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:45 IST

येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पहाटे भ्रमंती आणि निसर्गाच्या सान्निध्यात शुद्ध वातावरणाचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्यांना प्रवेशास मनाई केली आहे.. कारण तलाव परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे ट्रॅप कॅमेºयात कैद झाले आहे. शुक्रवारी वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट कैद झाला.

ठळक मुद्देतलाव परिसरात गाईची शिकार : नागरिकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र, सकाळ-सायंकाळी फिरण्यास मनाई आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पहाटे भ्रमंती आणि निसर्गाच्या सान्निध्यात शुद्ध वातावरणाचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्यांना प्रवेशास मनाई केली आहे.. कारण तलाव परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे ट्रॅप कॅमेºयात कैद झाले आहे. शुक्रवारी वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट कैद झाला.विद्यापीठाच्या तलाव परिसरात गाय फस्त केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. त्यानंतर विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने वनविभागाला पाचारण केले. घटनास्थळी गाय अर्ध्यापेक्षा जास्त फस्त झालेली असल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. पशुवैद्यकीय अधिकारी कुलकर्णी यांनी मृत गाईचा पंचनामा केला. काही अवयव ताब्यात घेतले. ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, गाईची खरेच बिबट्याने शिकार केली काय, याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावले होते. या ट्रॅप कॅमेऱ्यात मृत अधर्वट गाय पुन्हा खाण्यासाठी तोच बिबट्या आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बिबट्याचा विद्यापीठ परिसरात संचार असण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. विद्यापीठ प्रशासनाने पहाटे वा सायंकाळी फिरण्यास मनाई केली आहे. तलावाच्या परिसरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तलाव परिसरात प्रवेश न करण्याच्या सूचना लागल्या आहेत. ट्रॅप कॅमेºयात कैद बिबट्या शिकार करण्यासाठी विद्यापीठ परिसरात पुन्हा येईल, अशी शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे.बिबटे पोहरा-वडाळी जंगलातील!वनविभागाने विद्यापीठ परिसरात लावलेल्या ट्रॅप कॅमेºयात दोन बिबटे कैद झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठ परिसरात बिबट्यांची संख्या अधिक असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पोहरा, वडाळी जंगलातून बिबट येत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट कैद झाला आहे. त्यामुळे गाईची शिकार बिबट्यानेच केली,हे सिद्ध झाले आहे.. तो पुन्हा शिकारीसाठी त्याच परिसरात येण्याची दाट शक्यता आहे.- अशोक कविटकरसहायक वनसंरक्षकअमरावती.विद्यापीठ परिसरात फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. बिबट याच भागात असल्यामुळे दक्षतेसाठी हा निर्णय घेण्यात आला. काही अनुचित प्रकार झाल्यास नागरिक जबाबदार राहतील.- रवींद्र सयामउपकुलसचिव, सुरक्षा विभाग विद्यापीठ.