शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी इच्छुकांकडून ‘गॉडफादर’ची मनधरणी

By admin | Updated: October 23, 2016 00:28 IST

जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट होणार आहे.

मोर्चेबांधणी : पालिका निवडणुकीत रंगतअमरावती : जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट होणार आहे. त्यामुळे या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपआपल्याच उमेदवारी मिळावी यासाठी आपल्या राजकीय गॉडफादरची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या पाच-सहा दिवसात जवळपास सर्वच पक्षाच्या नगराध्यक्षपदासाठी असलेल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. येत्या डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील नऊ नगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या २७ नोव्हेंबर रोजी पार पडत आहेत. त्यात अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, शेंदूरजनाघाट, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे या नगरपरिषदांचा समावेश आहे. या सर्व पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ ते २९ आॅक्टोबर दरम्यान नामनिर्देशन पत्र वाटप करून ते स्वीकारण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदासाठी होणाऱ्या थेट मतदान प्रक्रियेसाठीही नामनिर्देशन वाटप आणि स्वीकारण्यासाठी वरीलच मुदत देण्यात आली आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता सुरू झाली. त्यातच नामनिर्देशनपत्रासाठी केवळ आठवडाभराची मुदत मिळाली असल्याने या निवडणुकीत स्वबळावर लढविण्याच्या तयारीत असलेल्या सर्वच उमेदवारांनी प्रभागनिहाय उमेदवारांची नावे निश्चित करण्यासोबतच नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर करण्यासाठी अल्प अवधी मिळाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व अन्य राजकीय पक्षांनी आपले उमेदवार स्वबळावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहिता लागताच सर्वच पक्षांनी आपापल्या पक्षातील नगराध्यक्षपदासाठी इच्छूक असलेल्या सर्वांचे अर्ज मागवून घेतले आहे. या अर्जातून आता सक्षम आणि पक्षासाठी योग्य अशा उमेदवारांच्या नावाची निश्चिती करण्यात येत आहे. त्यासाठी सातत्याने पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबतच निवडणुकांसाठी ठरवून देण्यात आलेल्या पक्ष निरीक्षकांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)