शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी येथील देशी दारू दुकानाचा परवाना रद्द

By admin | Updated: September 19, 2015 00:14 IST

भातकुली तालुक्यातील आष्टी येथील प्रकाश तुळशीराम जयस्वाल यांच्या देशी दारू दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पारित केले आहेत.

महिला जिंकल्या : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील आष्टी येथील प्रकाश तुळशीराम जयस्वाल यांच्या देशी दारू दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पारित केले आहेत. सदर देशी दारू दुकानाबाबत आष्टी ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. महिलांना होत असलेल्या त्रासामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था भंग पावण्याची शक्यता निर्माण झाली होती.आष्टी येथील प्रकाश जयस्वाल यांचे देशी दारू दुकान गावठाणापासून २ कि.मी. अंतरावर हटवावे, अशी विनंती ग्रामसभेने केली होती. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिला मतदारांचे गुप्त मतदान घेण्याचे ठरविले. मात्र जयस्वाल यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर १० मार्च २०१४ च्या आदेशानुसार हे देशी दारू दुकान २ महिन्यांच्या आत स्थलांतरित करावे, असे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. १० मार्चचा राज्य उत्पादन शुल्काचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला. जयस्वाल यांनी सादर केलेल्या याचिकेवर फेर आदेश काढावा आणि जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सर्वांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्या दरम्यान १७ जुलै २०१५ ला आष्टी येथील बसस्थानकाजवळ सुरेश डोमाजी जवंजाळ या इसमाला ४८ देशी दारूच्या बाटल्यासह अटक करण्यात आली. दारूचा हा साठा रेवसा येथील अडवाणी वाईन यांच्याकडील असल्याचे स्पष्ट झाले. उल्लेखनीय म्हणजे सुरेश जवंजाळ याच्याकडून जप्त केलेला माल आणि जयस्वाल याच्या दुकानातील बॅच क्रमांकाचा साठा जुळून आल्याने जयस्वालनेच तो साठा जवंजाळला विकण्यासाठी दिला असावा, अशा निष्कर्षाप्रत राज्य शुल्क विभाग पोहोचला. याचसंदर्भात जयस्वाल यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. मात्र त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांनी आष्टी येथील प्रकाश जयस्वाल यांच्या देशी दारूचा दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे. जिल्हाप्रशासनाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.(वार्ताहर)विद्यार्थी-महिलांना दिलासाआष्टी येथील वादग्रस्त देशी दारुविक्रीच्या दुकानाचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्यामुळे विद्यार्थी व महिलांना दिलासा मिळाला आहे. कारण दारुड्यांनी यथेच्च मद्य प्राशन करून गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न चालविला होता. जाणाऱ्या-येणाऱ्यांना शिवीगाळ करणे, भांडणे करण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. गावातील युवापिढी व्यसनाच्या आहारी गेली होती. त्यामुळे या दुकानाविरोधात महिलांनी एल्गार पुकारला होता. दारुविक्री बंद करण्यासाठी महिलांनी कंबर कसली होती.