शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादी पुनरीक्षणासाठी ९ जून ते ३१ जुलैपर्यंत अभियान

By admin | Updated: June 5, 2014 23:42 IST

लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदानापासून वंचित राहण्याची वेळ हजारो मतदारांवर आली होती. ही चूक पुन्हा विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने

अमरावती : लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदानापासून वंचित राहण्याची वेळ हजारो मतदारांवर आली होती. ही चूक पुन्हा विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना पुन्हा संधी दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदार यादी पुनरीक्षण, नवीन मतदार नोंदणीचे विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. ९ जून ते ३१ जुलै २0१४ पर्यंत हे अभियान सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत सांगितले.लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीत नाव नसल्यामुळे हजारो मतदारांना त्याचा घटनात्मक अधिकार बजावता आला नाही. यामुळे अनेक मतदारसंघात वादावादीचे प्रसंग उद्भवले. मतदारांना नाराज होऊन घरी परतावे लागले. जिल्हाधिकार्‍यांपासून आयोगापर्यंत अनेक तक्रारी झाल्यात. या सार्‍या प्रकाराची गंभीर दखल आयोगाने घेतली. ज्यांची नावे वगळली गेली आहेत. अशा सर्व मतदारांना व नवीन मतदारांना नाव नोंदणी करण्याची पुन्हा संधी देण्यात आली आहे. २१ व २२ जून तसेच २८ व २९ जून रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. पत्रपरिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रवींद्र धुरजड उपस्थित होते.  (प्रतिनिधी)९ जून ते ३१ जुलैपर्यंत अभियानअमरावती जिल्ह्यात ९ जूनपासून विशेष मतदार नोंदणी अभियान सुरु करण्यात येणार आहे. ते ३१ जुलै २0१४ पर्यंत राहणार आहे. या मोहिमेत पूर्वीच्या यादीमधून ज्यांची नावे वगळली आहेत त्यांना आपली नावे पुन्हा समाविष्ट करता येणार आहे. याशिवाय १ जानेवारी २0१४ रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाली आहे त्यालाही नवीन नाव नोंदणी करता येणार आहे.