समिती गठित : शासनाला अहवाल सादर, कार्यवाही नाहीअमरावती : विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. त्यासाठी एक समितीही नियुक्त केली आहे. त्या समितीने आपला अहवालही शासनाला सादर केला आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे जिल्ह्यातील काही ठिकाणी विद्यार्थ्यांवर मात्र दप्तराबरोबरच पाण्याचेही ओझे वाहून नेण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यात प्राथमिक शाळांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहे. मात्र अद्यापही अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही पाणी नसल्याचा परिणाम शालेय पोेषण आहारावरही होत आहे. विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्याबरोबरच पाण्याच्या बाटल्या अतिरिक्त ओझेही शाळेमध्ये घेऊन जावे लागत आहेत. जिल्ह्यात मागील दोन नश्रत्रामध्ये पाऊसच पडला नाही. त्याचा मोठा परिणाम शेतकऱ्याबरोबरच शाळेतील विद्यार्थ्यावरही आला आहे. विद्यार्थ्यांना दररोज दप्तराबरोबरच शाळेत बाटल्यामध्ये पिण्याचे पाणीही घेऊन जावे लागत आहे. सध्या उन्हाचा पारा ३७ अंशाच्या जवळ पोहचला आहे. त्यामुळे उन्हाळ्याचा तडाखा विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. दप्तरासाठी एक पीशवी व पाण्याच्या बाटल्यासाठी दूसरी पिशवी घेऊन जात असलेले विद्यार्थी असे चित्र पहावयास मिळत आहे. अनेक शाळांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी हातपंपाची सोय करण्यात आली आहे. मात्र पाऊस नसल्याने काही ठिकाणच्या हातपंपालाही पाणी येत नाही. त्याचबरोबर काही शाळांमध्ये गावाला पाणी पुरवटा करणाऱ्या योजनामधून पाणी दिले जाते. मात्र त्या योजनाही पाण्याअभावी बंद पडल्याने तर काही ठिकाणी वीज जोडणी नसल्याने पडून आहेत. परिणामी गुरुजी समोर पाण्याचा प्रश्न मोठा उभा राहीला आहे. काहीही आले तरी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी व शालेय पोषण आहारासाठी पाणी आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना गुरुजींनाच कराव्या लागतात. शाळेच्या शेजारी ज्यांची शेती आहे त्या शेतकऱ्यांकडे गुरुजींना पाणी देण्यासाठी विनवणी करावी लागते. शेतकऱ्यांकडेही थोडेच पाणी असल्योन ते पाणी देण्यासाठी सहमती देतीलच असे नाही. मात्र काही शेतकरी शाळेती विद्यार्थ्याकडे पाहून शाळेला पाणी देण्यासाठी अनुकूल दिसत असल्याचे सुखद चित्रही काही ठिकाणी पहावयास मिळते. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या पाठीवर पाण्याचेही ओझे
By admin | Updated: July 19, 2015 00:13 IST