शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

बी.टी.च्या १० लाख पाकिटांची मागणी

By admin | Updated: May 12, 2015 00:16 IST

यंदाच्या खरीप हंगामामध्ये ७ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली प्रस्तावित आहे. या क्षेत्रात विविध पिकांकरिता १ लाख २७ ...

खरीप महिन्यावर : यंदा पिकांसाठी लागणार सव्वा लाख क्विंटल बियाणेगजानन मोहोड ल्ल अमरावतीयंदाच्या खरीप हंगामामध्ये ७ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली प्रस्तावित आहे. या क्षेत्रात विविध पिकांकरिता १ लाख २७ हजार क्विंटल बियाणे लागणार आहेत. यामध्ये सर्वाधिक १ लाख १४ हजार क्विंटल सोयाबीन व संकरित कपाशीची (बी.टी.) ९ लाख ९७ हजार पाकिटे लागणार आहेत. कपाशी व सोयाबीनसह इतर पिकांच्या बियाण्यांची मागणी कृषी विभागाने नोंदविली आहे. जिल्ह्यात ३ लाख २४ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे यासाठी एक लाख १४ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. यापैकी ५० हजार क्विंटल बियाण्यांची मागणी महाबीजकडे नोंदविण्यात आली आहे. संकरित कापसाचे (बी.टी.) १ लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून यासाठी ९ लाख ९७ हजार पाकिटे लागणार आहेत. तूर पिकाकरिता १ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आह तर ४ हजार ७७६ क्ंिवटल बियाण्यांची गरज आहे. यापैकी २ हजार ५०० क्विंटल महाबीजकडून उपलब्ध होणार आहे. मुगाकरिता ३८ हजार ४८३ सर्वसाधारण क्षेत्र आहे. यासाठी १ हजार २६० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यापैकी ३०० क्विंटल बियाणे महाबीज कडून उपलब्ध होणार आहे. उडिदाचे ५ हजार ११८ हेक्टर पेरणी क्षेत्र असून २४४ क्विंटल बियाणे लागणार आहे. यापैकी १५० क्विंटल महाबीजकडून उपलब्ध होईल. संकरित ज्वारीकरिता २१ हजार ९०६ हेक्टर पेरणीक्षेत्र प्रस्तावित असून २ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये १ हजार ३०० क्विंटल बियाणे महाबीजकडून उपलब्ध होणार आहे. सुधारित कापसाकरिता १० हजार १५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. याक्षेत्राकरिता ६० क्विंटल बियाण्यांची गरज आहे. बाजरीकरिता ५० हेक्टर क्षेत्र आहे व ६ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. जिल्ह्यात चिखलदरा व धारणी तालुक्यात धानाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. यावर्षी ६ हजार ७४५ हेक्टर पेरणीक्षेत्र आहे. यासाठी २ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये एक हजार ३०० क्विंटल बियाण्यांची मागणी महाबीजकडे नोंदविण्यात आली आहे. अशी तपासावी सोयाबीन बियाण्यांची उगवणशक्तीसोयाबीनच्या पोत्यामध्ये खोलवर हात घालून मुठभर बियाणे काढावेत. गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे घेऊन एक तुकडा जमिनीवर पसरावा, सोयाबीनचे १०० दाणे दीड ते दोन से.मी. अंतरावर १०-१० च्या रांगेत एका तुकड्यावर ओळीत ठेवावेत. अशा प्रकारे तीन नमुने करावे. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे व त्यावर दुसरा तुकडा अंथरावा, गोणपाटाच्या तुकड्याची गोल गुंडाळी करुन थंड ठिकाणी ठेवावे. त्यावर अधून-मधून पाणी शिंपडावे, ६-७ दिवसानंतर गुंडाळी जमिनीवर पसरावी. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे काढावेत, ७० पेक्षा जास्त दाण्याला कोंब आल्यास बियाणे उत्तम समजून एकरी ३० किलो पेरणी करावी. उगवणशक्ती कमी आल्यास तेवढे बियाणे वाढवून द्यावे. साडेनऊ लाख बी.जी-२ पाकिटांची मागणीयंदाच्या हंगामात सर्वाधिक ९ लाख ६० हजार पाकिटे बी.जी.-२ कापसाची आहेत. बीजी-१ हे ३७ हजार ५०० पाकीट आहे. ३०२८ व ६५१ वाणाची १५ लाख पाकिटांची मागणी आहे. ७३५१ वाणाची १ लाख पाकिटे, १५५ वाणाच्या बियाण्यांची २ लाख पाकिटांची मागणी आहे. अशा सर्व उत्पादक कंपन्याची ९ लाख ९७ हजार पाकीट बियाण्यांची मागणी आहे.