अमरावती : केंद्र शासनाने नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क या योजनेद्वारे देशातील जवळपास २ लाख ५० हजार ग्रामपंचायतींना आॅप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉडब्रँड इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या इंटरनेट कनेक्टीव्हीटीने ई-पंचायत अंमलबजावणीस गतिमानता येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायतींना याचा फायदा होणार आहे. एनओएफएन या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने भारत ब्रॉडब्रँड नेटवर्क लि. (बीएसएनएल) ही कंपनी स्थापन केलेली आहे. राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी टप्प्या टप्प्याने सुरू झालेली आहे. ही राष्ट्रीय विकास योजना असल्याने राज्य शासन सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना या प्रकल्पाची सुरळीत अंमलबजावणी व्हावी म्हणून त्रिपक्षीय करारनामा केला आहे. नॅशनल आॅप्टिकल फायबर अंतर्गत आॅप्टिकल फायबर टाळण्यासाठी त्रिपक्षीय करारनामा झाल्यामुळे नि:शुल्क हक्क मिळणार आहे. कुठल्याही प्रशासकीय विभागाची किंवा यंत्रणेची पूर्व मान्यतेची आवश्यकता लागणार नाही. राज्य शासनाने नि:शुल्क मार्ग हक्कासाठी दिलेली पूर्ण सहमती ही राज्य शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागांना अथवा पुनर्भरण शुल्क शासन अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आकारण्यात येणार नाहीत. (प्रतिनिधी)
ग्रामपंचायती जोडणार ब्रॉडब्रँड इंटरनेटने
By admin | Updated: August 11, 2014 23:39 IST