शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाला राज्यात अव्वलस्थानी आणू

By admin | Updated: May 3, 2017 00:24 IST

विस्तीर्ण जागा, शिक्षणाची वैभवशाली परंपरा व अनुकूल वातावरण यामुळे राज्यात अव्वलस्थान मिळविण्याची क्षमता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आहे.

ना.प्रवीण पोटे यांचा आशावाद : चार इमारतींचे लोकार्पण अमरावती : विस्तीर्ण जागा, शिक्षणाची वैभवशाली परंपरा व अनुकूल वातावरण यामुळे राज्यात अव्वलस्थान मिळविण्याची क्षमता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावणे, नवनवे प्रकल्प सुरू करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी येथे दिली.विद्यापीठ परिसरातील डॉ.शिवाजीराव पटवर्धन संशोधक व पदव्युतर विद्यार्थी वसतिगृह, केंद्रीय मूल्यांकन भवनाची विस्तारित इमारत, कम्युनिटी स्टुडिओ आणि शिक्षकेतर कर्मचारी अतिथीगृहाच्या चार इमारतींच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी पोटे बोलत होते. कुलगुरु मुरलीधर चांदेकर अध्यक्षस्थानी होते. गृह राज्यमंत्री रणजित पाटील, खा.आनंदराव अडसूळ, कुलसचिव अजय देशमुख यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विविध बदलांना सामोरे जाताना नवनव्या अभ्यासक्रमांची रचना केली पाहिजे, असे सांगून ना. पाटील म्हणाले की, अभ्यासक्रम अधिक रोजगाराभिमुख झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी पारंपारिक अभ्यासक्रमांबरोबरच स्पर्धा परीक्षांमध्ये देखील यश मिळवावे, यादृष्टीने अमरावती विद्यापीठाकडून प्रयत्न होत आहेत. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांनी उद्योगक्षेत्रात आठ लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. त्या उद्योगांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ विद्यापीठाने निर्माण करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.विद्यापीठाने चारही इमारतीचे काम उत्कृष्टरित्या व वेळेत पूर्ण केल्याबद्दल ना. रणजित पाटील यांनी समाधान व्यक्त केले. विद्यापीठात कामानिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अतिथीगृहाची तसेच ध्यानधारणा केंद्राची निर्मिती ही अभिनव व स्वागतार्ह बाब असल्याचेही ना.पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, बदलत्या काळात शिक्षणाला कौशल्याची जोड देण्यासाठी विद्यापीठाकडून अधिक प्रयत्न व्हावेत. विद्यापीठाने संशोधनाला चालना देणाऱ्या अभ्यासक्रमावर भर द्यावा व तंत्रज्ञानात गतीने होणाऱ्या बदलांची दखल घेत वेळोवेळी अभ्यासक्रम अद्ययावत करण्यावर भर द्यावा, अशी सूचना यावेळी खा.अडसूळ यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या विकासासाठी शासनाची भूमिका सदैव सकारात्मक राहिल्याचे कुलगुरु चांदेकर यांनी सांगितले. नवे अभ्यासक्रम रोजगाराभिमुख राहील असा दावाही त्यांनी केला. प्रास्ताविक कुलसचिव अजय देशमुख यांनी तर जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर यांनी संचालन केले. विद्यार्थी कल्याण मंडळाचे गणेश मालटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)