अमरावती : सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळकरी मुला- मुलींना दरवर्षी मोफत गणवेश दिले जातात. परंतु यंदा शैक्षणिक सत्र सुरू होऊनही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले नाही.
.............................
जिल्हा परिषदेच्या प्रवेशव्दारासमोर खडे
अमरावती : जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशाव्दारासमाेरच खडे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पाणी साचले जाते. रस्त्यातील खडे बुजविण्याचा मुहूर्त अद्यापही मिळालेला नाही.
..........................
दोनोडा ते रावळगाव रस्ता उखडला
अचलपूर : तालुक्यातील दोनोडा ते रावळगावकडे जाणारा रस्ता उखडला. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांना पायी चालणेसुध्दा कठीण झाले आहे. हा नादुरुस्त रस्ता दुरुस्त करणे आवश्यक आहे.
.............................
सातेगाव, कापुसतळणी पीएचसीत लसीकरण
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील सातेगाव, कापुसतळणी, कोकर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवार २९ जून रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
.........................
अमरावती ते निमखेड बाजार बसफेरी सुरू करा
अंजनगाव सुर्जी : अमरावती ते निमखेड बाजार ही गत काही वर्षापूर्वी सुरू असलेली मुक्कामी बसफेरी बंद केली आहे. ती एसटी महामंडळाने पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
..........................