अमरावती : राज्य परिवहन महामंडळातील अनेक बस गाड्या भंगार झाल्या असतानाही त्यातून प्रवासी वाहतूक होत आहे. त्यामुळे भंगार बसेसचे चित्र केव्हा पालटणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
.........................
चौसाळा येथे महापरिनिर्वाण दिन
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील चौसाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात नुकताच भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस पाटील श्याम काळमेघ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र ढोके, श्रीकांत काळमेघ, करुणा पाखरे, प्रियंका चाफले, माया इंगळे, आशा मेमनकर, सुशिला गवई, अशोक काळमेघ, राधा मुरापे, मंगल इंगळे व आशा वर्कर व नागरिक उपस्थित होते.
.......................................................................................
गोपालनगर ते सुतगिरणीपर्यंतचा रस्ता उखडला
अमरावती : गोपालनगर ते सुतगिरणीकडे जाणार डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. परिणामी या मार्गावरून ये- जा करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
......................................................
ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर
चिखलदरा : येथील ग्रामीण रुग्णालय येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व राजीव गांधी ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने शनिवार १२ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते १ वाजता दरम्यान होणाऱ्या या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन झेडपी सदस्य प्रकाश साबळे यांनी केले आहे.
...........................................
झेडपी सभापतींच्या अंगणवाडी केंद्राना भेटी
अमरावती : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती पुजा आमले यांनी गुरुवारी मोर्शी तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन तेथील कामाची तपासणी केली. यावेळी त्यांनी हिवरखेड, दापोरी, पाळा, निंभी, नेरपिंगळाई आदी अंगणवाडी केंद्रांना भेटी दिल्यात.
...................................................
झेडपी बांधकाम समितीची सभा
अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विषय समितीची सभा नुकतीच सभापती प्रियंका दगडकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पार पडली. यावेळी सभेत बांधकाम विषयक मुद्यावर विस्तुत चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी सदस्य सुरेश निमकर, विक्रम ठाकरे व अन्य उपस्थित होते.
.........................................................
भातकुली पंचायत समितीअंतर्गत रस्त्याची दुरुस्ती
अमरावती : भातकुली पंचायत समिती अंतर्गत डांबरी रस्ता काही दिवसांपासून खराब झाला होता. अखेर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.