अमरावती : जिल्हा परिषदेत कामकाजाचा भार हलका व्हावा, याकरिता स्वच्छ प्रशासन मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने कर्मचाऱ्यांनी विविध विभागांत पेडिंग़ कामाचा निपटारा करण्यासाठी प्रशासन जोमाने कामाला लागले आहे.
.............................
पाणीटंचाईचा आराखडा केव्हा?
अमरावती: दरवर्षी उन्हाळयाच्या दिवसात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्या निवारणासाठी पाणी टंचाई आराखडा तयार केला जातो. मात्र, अद्यापही झेडपी पाणीपुरवठा विभागाने हा आराखडा तयार केला नाही. त्यामुळे टंचाई आराखड्याचा मुहूर्त केव्हा निघेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
.................................
इर्विन ते कॅम्प चौक रस्ता उखडला
अमरावती : स्थानिक इर्विन कॅम्प चौकाकडे जाणारा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये- जा करणाऱ्या वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
.......................................
दोन दिवस शासकीय कार्यालयांना टाळे
अमरावती : शासकीय कार्यालयांना सलग दोन दिवस सुटया आहेत. त्यामुळे शनिवार व आणि रविवार अशा दोन दिवस शासकीय कार्यालयाना टाळे राहणार आहेत. परिणामी सोमवारी नेहमीप्रमाणे कार्यालये उघडतील. पुन्हा मंगळवार प्रजाकसत्ताकदिनी शासकीय कामकाज बंद राहणार आहे.
.................................