--------------
धानोरा गुरव शिवारात युवकाला शिवीगाळ
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील धानोरा गुरव शिवारात डीबीवर दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या अनिल नामदेवराव तायडे (३६, रा. सार्सी कोठोडा) या युवकाला निरज दिलीप पुसदकर (३५) व मुन्ना शरद धानोरकर (३०, दोन्ही रा. धानोरा गुरव) यांनी शिवीगाळ केली व धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला.
--------------
मंगरूळ चव्हाळा येथे इसमावर हल्ला
मंगरूळ चव्हाळा : नजीकच्या जगतपूर येथे हसन भसन भोसले (४५) यांना पत्नी मांगलीलाल, इसेलाल कलगु भोसले, रेगलाल बाबूसिंह भोसले, बाबूशाह बाबूसिंह भोसले (सर्व रा. जगतपूर) यांनी दगड-सत्तूरने मारहाण केली. दोन एकर जमीन परत घे आणि चारही मुले मला दे, असा प्रस्ताव मांगीलालने टाकला होता. तो हसनने नाकारला. मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
-----------
खाणानावळीत इसमाला मारहाण
हिवरखेड : खाणावळीत जोरजोराने ओरडत असलेल्या टोळक्याला हटकल्याने राधेश्याम जयराम धुवे (४४,रा.साई) यांना मारहाण करण्यात आली. मोर्शी पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये शुभम हरीश शिरभाते, प्रफुल्ल हरीश शिरभाते व शंभू काळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.