शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळतोय वधुपिता

By admin | Updated: January 17, 2015 22:51 IST

दरवर्षीच्या नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न झालेले नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण बाजारपेठेवर झाला आहे.

अमरावती : दरवर्षीच्या नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न झालेले नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण बाजारपेठेवर झाला आहे. आर्थिक व्यवहार मंदावले आहे. दुष्काळच्या झळामध्ये वधुपिता होरपळत आहे. उपवर-वधूचे लग्न लांबणीवर पडत आहे. प्रसंगी नोंदणी विवाहाला प्राधान्य दिले जात आहे.मागील वर्षीचा हंगाम अतिपावसामुळे उद्ध्वस्त झाला. यंदा पावसाअभावी खरीप व रबीच्या सरासरी उत्पन्नात ५० टक्क्यांवर कमी आलेली आहे. जिल्ह्यातील १९६२ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. खरिपाचा हंगाम दोन महिने उशिरा सरू झाल्याने रबीचा हंगामही माघारला आहे. वातावरणात धुके, कडाक्याची थंडी, ढगाळ वातावरण, कधी अकाली पाऊस जमिनीत नसणारी आर्द्रता, अद्याप फुलोऱ्यावर नसलेला हरभरा, तुरीवर शेंगा पोखणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव, संत्राच्या आंबिया बहराला न ताण बसल्याने कमी आलेली फूट, मृग बहराचे फळ कमी भावाअभावी अद्याप झाडावर यासारख्या अन्य समस्यांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने दिलेल्या दुष्काळी मदतीमध्ये पेरणीचा खर्चदेखील निघत नाही. जगाव कसं? मुला-मुलींचे शिक्षण, दररोजचा उदर निर्वाह, उपवर-मुलामुलींचे लग्नकार्य कसे करावे, या विवंचनेत वधुपिता आहे. मंगल कायालये, कॅटरर्स, कपडे दागिन्यांवर खर्च व कार्यक्रमासाठी उधळण करणे आजच्या परिस्थितीत शक्य नाही. यामुळे आठवड्यात दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत झाल्या आहे. त्यांना आर्थिक मदतीची गरज असताना प्रचलित निकषाप्रमाणे मदत दिली जात आहे. तीही तुटपुंजी आहे. मागणीच्या ४० टक्के दुष्काळी निधी वितरित होणार आहे. ग्रामीण भागाचे अर्थचक्र हे शेतीपिकाच्या उत्पन्नावर आधारित असते. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत ४० टक्केही उत्पन्न नाही. शेतमालास आधारभूत किमतीएवढीही भाव मिळत नाही. सोयाबीन, कापसाचे भाव कमी झाले आहे. व्यापारी बेभाव खरेदी करत सर्वत्र शेतकऱ्यांची कोंडी करीत असल्याने दुष्काळाच्या झळामध्ये आज शेतकरी होरपळला जात आहे. (प्रतिनिधी)