शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

वनपालांच्या बदल्यांमध्ये वशिलेबाजीला ब्रेक

By admin | Updated: May 27, 2014 00:22 IST

वनपालांच्या बदल्यांमध्ये होत असलेल्या गैरप्रकार आणि वशिलेबाजीला यंदा ब्रेक लावण्यात आला आहे. मुख्य वनसंरक्षकांनी या बदल्यांमध्ये थेट लक्ष घालून पारदर्शकता आणली आहे.

अमरावती : वनपालांच्या बदल्यांमध्ये होत असलेल्या गैरप्रकार आणि वशिलेबाजीला यंदा ब्रेक लावण्यात आला आहे. मुख्य वनसंरक्षकांनी या बदल्यांमध्ये थेट लक्ष घालून पारदर्शकता आणली आहे. त्यामुळे बाबूगिरीला तर फाटा बसलाच याउलट वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या आर्थिक देवाणघेवाणीलादेखील लगाम लावण्यात आला आहे.

मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी २२ मे रोजी अमरावती वन वृत्तातील २१ वनपालांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये सरळसेवा वनपाल, पदोन्नत वनपाल या दोघानांही समसमान न्याय देत मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सामाजिक वनीकरण, कार्यआयोजना आणि वनविभाग या चारही शाखांमध्ये ज्या वनपालांचे नियतकालावधी झाला त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. तत्पूर्वी मुख्य वनसंरक्षकांनी २0 वनरक्षकांना वनपालपदी बढतीचे आदेश दिले आहेत. वन विभागात बदली व पदोन्नती म्हटले की बाबूगिरीला सुगीचे दिवस येतात. परंतु यंदा सीसीएफ तिवारी यांनी प्रक्रिया पारदर्शपणे राबवून वनपालांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. स्वत:च्या निगराणीत बदल्यांची प्रक्रिया पार पडल्याने यात हस्तक्षेप करून चिरीमिरी करण्याचे स्वप्न बघणार्‍या वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले. वनपरिक्षेत्र अधिकारी बदल्यांमध्ये हस्तक्षेप करून मर्जीतील वनरक्षक, वनपालांना वनपरिक्षेत्रात घेण्यासाठी अर्थकारणाचा वापर करतात. ही बाब सीसीएफच्या निदर्शनात आली. बदल्यांमध्ये होत असलेल्या अर्थकारणाला पूर्णविराम मिळावा यासाठी सीसीएफ तिवारी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारीच काय तर उपवनसंरक्षकांचाही हस्तक्षेप खपवून घेतला नाही, हे वास्तव दर्शविले. रिक्त असलेल्या वनपालांच्या जागा पदोन्नतीच्या मार्गाने भरण्यात आल्याने कर्मचार्‍यांमध्ये सीसीएफच्या या कार्यप्रणालीवर आनंद पाहावयास मिळत आहे.