शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा आवासमधील बोगस लाभार्थ्यांना लागणार ब्रेक

By admin | Updated: August 18, 2015 00:14 IST

इंदिरा आवस योजनेतील बोगस लाभार्थी म्हणून अनुदान लाटणाऱ्यांना आता ब्रेक लागणार आहे.

अटी, शर्ती : आधार जॉबकार्डची आवश्यकताअमरावती : इंदिरा आवस योजनेतील बोगस लाभार्थी म्हणून अनुदान लाटणाऱ्यांना आता ब्रेक लागणार आहे. सन २०१५-१६ या वर्षात लाभार्थींच्या बँक किंवा पोस्टातील खात्यावर अनुदान पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टिमच्या (पीएफएमएस) माध्यमातून जमा होणार आहे. मात्र, आता या अनुदानासाठी आधार कार्डलिंक आणि रोजगार हमी योजनेचे जॉबकार्ड आवश्यक करण्यात आले आहे. अनुदानासाठी आधारकार्ड अनिवार्य केले जाणार आहेत. केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत नवीन निधी वितरण प्रणालीनुसार केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त होणारा निधी राज्य व्यवस्थापन कक्ष इंदिरा आवासचे अनुदान बँक खात्यात जमा करणार आहे. या खात्याची पीएफएमएस प्रणालीवर नोंद होणार आहे. त्यानंतर या योजनेंतर्गत गट स्तरावरुन प्राप्त झालेल्या योजनेच्या लाभार्थींच्या यादीनुसार बँक पोस्ट खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येणार आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकूल मंजूर देताना सद्यस्थितीत अस्तित्वात असलेली कार्यपध्दती कायम राहणार आहे. अनुदान लाभार्थ्यांच्या बँक, पोस्ट खात्यात जमा करण्यासाठी तालुका पंचायत समितीत कार्यरत सहायक लेखाधिकाऱ्यांना फर्स्ट सिग्नेटही व गटविकास अधिकाऱ्यांना सेकंड सिग्नेटरी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. डिजिटल्स कार्यान्वित करणे तसेच खंडित करण्याचे अधिकार राज्य व्यवस्थापन कक्ष इंदिरा आवास योजनेतील सहायक संचालक (लेखा) यांना प्रदान करण्यात आले आहे. यासाठी ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्याला त्याचा लॉग ईन व पासवर्ड दिला जाणार आहे. यामध्ये प्राधिकृत अधिकारी बदली, रजा, किंवा निवृत्ती झाली तर त्यासाठी इतर अधिकाऱ्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)