नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात वेणी गणेशपूर येथील गावाच्या वरच्या भागाला असलेले आदितापूर परिसरातील पाझर तलावाच्या भिंतीला मधोमध भगदाड पडले. १५ ते २० फुटांची भिंत कोसळल्याने साठलेले पाणी वाहून गेले.
पाझर तलावाची दुरुस्ती करावी, अशी यापूर्वी लघु पाटबंधारे विभागाकडे गावकऱ्यांनी मागणी केली होती. पण, त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे ग्रामस्थ सुनील मारोटकर यांनी सांगितले. तलावातील पाणी वाहून गेल्याने आजूबाजूच्या शेतीचे नुकसान झाले तसेच गावातील पाणीपुरवठा यंत्रणेवरील याचा परिणाम जाणवेल. तलावाची त्वरित दुरुस्ती करावी व शेतकऱ्यांना सुविधा द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद कठाळे यांनी केली आहे.
दरम्यान, वेणी गणेशपूर, नांदसावंगी व तालुक्यात झालेल्या पूरग्रस्त भागाला तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी मंडळवारी भेट देऊन पाहणी केली व पूरस्थितीचा आढावा घेतला. सुदैवाने तालुक्यात कोठेही जीवितहानी
नसल्याचे ते म्हणाले.
070921\img-20210907-wa0016.jpg
वेणी गणेशपुरच्या पाझर तलावाच्या भिंतीला भगदाड पडले.