शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीच्या सिंचन कामांना ‘ब्रेक’

By admin | Updated: May 27, 2014 23:20 IST

जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या जिल्हय़ातील सिंचन तलाव, पाझर तलाव, साठवण बंधारे आणि कोल्हापुरी बंधार्‍यांची कामे कोलमडून पडली आहेत. आचारसंहितेचा बाहू करीत मंजूर

आचारसंहितेचा बडगा : जिल्हा परिषदेतील यंत्रणा हतबल

जितेंद्र दखने - अमरावती

जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या जिल्हय़ातील सिंचन तलाव, पाझर तलाव, साठवण बंधारे आणि कोल्हापुरी बंधार्‍यांची कामे कोलमडून पडली आहेत. आचारसंहितेचा बाहू करीत मंजूर करण्यात आलेल्या ५0 हून अधिक कामांपैकी केवळ १५ कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याने सुमारे १२ करोड रूपयांची सिंचनाची कामे रखडली आहेत.

तलावातील गाळ काढण्यापासून ते प्रकल्पाच्या देखभालीच्या कामांनाही ठेंगा दाखविण्यात आला आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत पाझर तलाव, सिंचन तलाव, साठवण बंधारे, ब्रिटीशकालीन बंधारे, कोल्हापुरी बंधार्‍यांची कामे करण्यात येतात.

आर्थिक चालू वर्षात जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या ५0 हून अधिक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी लोकसभा निवडणूक आणि आता विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होऊ घातल्याने आचारसंहितेचा फटका या सिंचनाच्या कामांना बसला आहे. आचारसंहितेचा बाहू करीत प्रशासकीय यंत्रणेने सिंचनाची ही कामे सुरू करण्यास पुढाकार न घेतल्याने सुमारे १0 कोटींहून अधिक किमतीची कामे अद्याप सुरू होऊ शकली नाहीत. याशिवाय सिंचन तलावाच्या स्वच्छतेविषयक कामांनाही याचा फटका बसला आहे. लघु पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यात १0 हजार हेक्टरपेक्षा जास्त शेती सिंचनाखाली आली आहे. यंदा मंजूर ५0 पेक्षा जास्त सिंचन तलाव व बंधार्‍यांच्या माध्यमातून ५ हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र वरील प्रमाणे उद्दिष्टपूर्ती होणे सध्या तरी अशक्य आहे.

या कामासाठी ४ कोटी ७५ लाख रूपयांचा निधी देखील मंजूर केला होता. बहुतांश कोल्हापुरी बंधारे नादुरूस्त अवस्थेत आहेत. सिंचन तलावांच्या देखभाली पासून ते कोल्हापुरी बंधार्‍यांच्या दुरूस्तीपर्यंत विविध कामे लघु पाटबंधारे विभागामार्फत केली जातात. मात्र यावर्षी या कामाचा श्रीगणेशाच झाला नाही.

तलावांमधील गाळ काढणे महत्त्वाचे काम आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक आहे अन्यथा पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने जलसाठा या तलावामध्ये साठवू शकत नाही. याचा फटका सिंचनावर आणि तलावांच्या कार्यक्षमतेवर होतो. आचारसंहितेचा बागुलबुवा करीत ही कामे अडगळीत अद्यापही पडून आहेत. त्यामुळे या कामाची मुहूर्तमेढ केव्हा निघते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकीकडे विदर्भात सिंचनाचा अनुशेष मोठय़ा प्रमाणात असताना अनुशेष भरुन काढण्यासाठी शासन ते प्रशासनापर्यंतचे सर्वच जण नेहमीच गाजावाजा करीत असतात. परंतु दुसरीकडे सिंचन प्रकल्प मंजुर असताना ही कामे वेळीच मार्गी लावण्यात येत नाहीत. (प्रतिनिधी)