शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएल लाभार्थींची साखर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:30 IST

शासनाने दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रेशनकार्डधारकांची साखर बंद करून फक्त अंत्योदय कार्डधारकांनाच साखर देण्याचा निर्णय १५ सप्टेंबर रोजी घेतला असला तरी.....

ठळक मुद्देदीड लाख लाभार्थ्यांना फटका : अंत्योदयवर एक किलो साखर

जितेंद्र दखने । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रेशनकार्डधारकांची साखर बंद करून फक्त अंत्योदय कार्डधारकांनाच साखर देण्याचा निर्णय १५ सप्टेंबर रोजी घेतला असला तरी जिल्ह्यात जुलै महिन्यापासूनच साखर मिळणे बंद झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ८०६ इतक्या जुन्या बीपीएल कार्डधारकांना रेशनमधून मिळणारी साखर बंद झाली आहे. आता फक्त १ लाख २१ हजार ३७२ अंत्योदय कार्डधारकांनाच प्रतिकुटूंब एक किलो साखर दिली जात आहे. हे प्रमाण पूर्वी प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम होते.शासकीय धोरणानुसार मे महिन्यापर्यंत बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम साखर १३ रूपये ५० पैशांना मिळत होती तर सणासुदीला हे प्रमाण ६६० ग्रॅम इतके होते. परंतु केंद्र सरकारने आता फक्त अंत्योदय योजनेतील कुटुंबांनाच अनुदान देण्याचे कळविले होते. त्यानुसार मे २०१७ मध्ये राज्य शासनाने आदेश काढून सर्व जिल्ह्यांना या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे बजावले. जून महिन्यात बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड एक किलो इतकी साखर २० रूपये दराने विक्री करण्यात आली.परंतु जुलैपासून शासनाने बीपीएलधारकांना साखरविक्री बंद करून अंत्योदय कार्डधारकांनाच साखरेची विक्री सुरू केली आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ३७२ अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकुटुंब एक किलोप्रमाणे साखर रेशनवर दिली जात आहे. शुक्रवार १५ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅमप्रमाणे दिली जाणारी साखर आता प्रतिकुटुंब एक किलोनुसार देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.अर्ध्याहून अधिक प्रमाण घटलेप्रत्येक कुटुंबात सरासरी चार माणसे गृहित धरल्यास पूर्वी प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम प्रमाणे दोन किलो साखर अंत्योदय कार्डधारकांना मिळत होती परंतु शासनाने साखरेचे प्रमाण कमी केल्याने कुटुंबाला एक किलोच साखर मिळत आहे. एका कुटुंबात सहा सदस्य असले तरी त्यांना एक किलो साखरेवरच समाधान मानावे लागत आहे.जूनमध्ये बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती एक किलोप्रमाणे साखरेचे वितरण करण्यात आले. जुलैपासून केवळ अंत्योदय कार्डधारकांना एक किलो याप्रमाणे साखरेचे वाटप केले जात आहे.- अनिल टाकसाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी