शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बोंडेंना अटकपूर्व जामीन, लेखणीबंद मागे

By admin | Updated: October 6, 2016 00:29 IST

वरुडच्या नायब तहसीलदारांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेले आ. अनिल बोंडे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

नायब तहसीलदाराला मारहाण प्रकरण : गुरुवारपासून नियमित कामकाजअमरावती : वरुडच्या नायब तहसीलदारांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेले आ. अनिल बोंडे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन मागे घेण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेच्या २५० अर्जात त्रुटी असल्यामुळे नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांच्याशी वाद घालीत आ. अनिल बोंडे यांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी घडली. काळे यांनी वरुड ठाण्यात केलेल्या तक्रारीवर आ. अनिल बोंडे यांचेविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. त्यामुळे संतप्त महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा व विभागात लेखणीबंद आंदोलन सुरू केले. दरम्यान मंगळवारी आ. बोंडे यांनी जिल्हा व सत्र न्यायालय (५) मध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. यावर न्यायाधीश विमलनाथ तिवारी यांनी बुधवारी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून घेतला व गुरुवारी २५ हजारांच्या वैयक्तीक जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे न्यायालयाचा सन्मान ठेवत महसूल संघटनांनी लेखणीबंद आंदोलन मागे घेतले. त्यामुळे ६ आॅक्टोंबर गुरुवारपासून महसूल विभागाचे कामकाज नियमित सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)‘लोकमत’चे अभिनंदनमाजी सैनिक व कार्यकारी दंडाधिकारी असलेले नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना भाजपाचे उच्चविद्याविभूषित आ. अनिल बोंडे यांनी मारहाण केली. या घटनेविषयीचे वास्तव बुधवारी ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडले. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या लेखणीबंद आंदोलनात तहसीलदार राम लंके यांनी ‘लोकमत’च्या भूमिकेचे स्वागत केले. यावेळी उपस्थित शेकडो कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले. न्यायालयाचा सन्मान राखीत आम्ही लेखणीबंद मागे घेत आहे. आंदोलन काळातील प्रलंबित कामांचा त्वरित निपटारा करु. - सुरेश बगळे, राज्य कार्याध्यक्ष, तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना