शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

रक्तपाताने हादरले बारगाव, ‘तो’ क्रूरकर्मा मात्र निर्विकार !

By admin | Updated: January 24, 2015 22:45 IST

दिवसभर काबाडकष्ट करून सूर्य मावळताच कष्टकरी निद्रिस्त होतात. पहाटे उठून पुन्हा कामाला लागतात. परंतु शुक्रवारची मध्यरात्र बारगाववासीयांसाठी थरारक ठरली. त्यांच्या शांत

अनैतिक संबंधांची भयावह परिणती : गावात स्मशानशांतता, दहशत कायमच, घटनेनंतरही उघडली नाहीत बंद दारे संजय खासबागे/अश्वपाल वानखेडे - वरूड / बारगाववरूड : दिवसभर काबाडकष्ट करून सूर्य मावळताच कष्टकरी निद्रिस्त होतात. पहाटे उठून पुन्हा कामाला लागतात. परंतु शुक्रवारची मध्यरात्र बारगाववासीयांसाठी थरारक ठरली. त्यांच्या शांत आणि सरळ रेषेतील दिनचर्येला या घटनेने छेद दिला. येथे घडलेला रक्तपात त्या गावकऱ्यांसाठी ‘न भूतो न भविष्यती’ असाच होता. बारगाव येथील झोेपडपट्टीत वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात. आपण बरे अन् आपले काम बरे..अशी येथील प्रथा. शुक्रवारीसुध्दा येथील ग्रामस्थ थकून-भागून झोपी गेले. अर्धी रात्र उलटत नाही तोच गोंधळ उडाला. गावाच्या शांततेला छेद देणारी घटना घडली होती. अनैतिक संबंधाची क्रूर परिणती अवघा गाव पाहत होता. दोन निर्दोष चिमुकले झोपेतून जागे होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आईचा मृतदेह पाहून नि:शब्द झाले होते. घडलेल्या घटनेचे सुसूत्रीकरण त्यांच्या बालबुध्दीला शक्य नव्हते. बारगाव येथील मनोजसिंग भादा आणि गावातीलच विवाहिता अंजिरा उईके यांच्यातील अनैतिक संबंधांची अशी भयंकर परिणती कोणालाच अपेक्षित नव्हती. परंतु नको ते घडले. त्यामुळे सगळे गावच भांबावून गेले आहे. प्रेयसीला तिच्या दिरासह नको त्या अवस्थेत पाहून आरोपी मनोजसिंगचा पारा चढला. दारावर लाथ मारून त्याने घरात प्रवेश केला आणि चाकूने सपासप वार करून संपवून टाकले. त्यानंतर तो थेट स्वत:च्या घरी गेला. अनैतिक संबंधाचा सातत्याने विरोध करणाऱ्या पित्यावरही त्याने गावठी कट्ट्याने गोळी झाडली. पिता जागीच गतप्राण झाला. एव्हाना गावकऱ्यांना घटनेची कल्पना आली. पण, कोणीही घराबाहेर पडले नाही. आरोपी मनोजसिंगच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूूमी हेच त्या मागचे कारण होते. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. जीव मुठीत घेऊन गावकरी दुसऱ्या दिवशी हळूहळू बाहेर पडत होते आणि घटनेचा कानोसा घेत होते.