शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराजांचे न ऐकल्याने काशिनाथचा झाला खून’

By admin | Updated: October 19, 2016 00:11 IST

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांचे न ऐकल्यास किती भयंकर दुष्परिणाम होतात,...

सत्यशोधन अहवाल : सद्गुरू महात्म्य पुस्तकातील भयंकर अनुभवअमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांचे न ऐकल्यास किती भयंकर दुष्परिणाम होतात, याची नाना वर्णने ज्या सद्गुरू महात्म्य या पुस्तकात कथन करण्यात आली आहेत, त्याच पुस्तकात महाराजांचे न ऐकल्याने काशिनाथ टांगळेचा खून करण्यात आल्याचा अनुभव नमूद करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धामणगावच्या एन.आर.इंदलकर यांच्या न्यायालयात सादर केलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालात या भयंकर मुद्याचा समावेश आहे. शंकर महाराजांना अष्टसिद्धी प्राप्त आहेत. त्याआधारे ते चमत्कार करतात. त्यांचे न ऐकल्यास जीवासही मुकावे लागते, अशी दहशत पुस्तकाद्वारे नियोजितपणे पसरविण्यात आली असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. अहवालात चमत्कारांविषयी नमूद करण्यात आलेले एक उदाहरण असे- पान क्रमांक ६३ वर पांडुरंग हलमारे लिहितात, ''एखाद्याने श्री महाराजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले किंवा त्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले नाही, त्यांच्या आज्ञेची अवहेलना केली तर त्याचे परिणाम किती भयानक होऊ शकतात याची माझ्या देखत घडलेली घटना आपणास सांगतो.'' पांडुरंग हलमारे यांचा सुतारकाम करणारा सहकारी काशिनाथ टांगळे आश्रमाच्या पूर्व कोपऱ्यात बैलबंडी, वखर इत्यादीचे जू बनवायचा. त्याने बाभळीचे लाकूड एका मातंग गृहस्थाकडून घेतले. काशिनाथने पैसेही दिले; पण हा मातंग गृहस्थ काही दिवसांनी मरण पावला. त्याच्या मुलाने काशिनाथ टांगळेसोबत पैशावरून भांडण उकरून काढले. यानंतर आठ दिवसांनी महाराजाचा अमरावतीला कार्यक्रम होता. या दौऱ्यात महाराजाने काशिनाथ टांगळेला सोबत दौऱ्यावर अमरावतीला चालण्यास सांगितले. पण तो तयार झाला नाही. मला खूप कामे आहेत, असे तो म्हणाला. महाराजाने एकदोनदा चालण्याचा आग्रह केला. म्हणाले, काम होत राहील. मात्र तुम्ही अमरावतीला आले पाहिजे. टांगळेचा स्वभाव हट्टी होता. त्याने साफ नकार दिला. भक्त मंडळी व महाराज अमरावतीला निघून गेले. जेथे महाराजांची व्यवस्था करण्यात आली होती त्या खोलीचे दार महाराजांनी बंद केले. नंतर काही वेळाने महाराज बाहेर येऊन म्हणाले, आपल्या आश्रमाच्या परिसरात एक दुर्घटना घडली आहे. एक जीव गेला आहे. आम्ही भक्त विचारात पडलो. संध्याकाळी पिंपळखुट्याला आल्यावर कळले की, काशिनाथ टांगळेसोबत मातंग मुलाने भांडण केले. ते विकोपाला गेले आणि त्या मुलाने काशिनाथ टांगळेचा खून केला. पुढे पांडुरंग हलमारे लिहितात, टांगळेने जर महाराजांचे ऐकले असते तर त्याचा जीव वाचला असता. अरविंद देशमुख यांनी लिहिलेल्या 'श्री सद्गुरू महात्म्य' पुस्तकाचे प्रकाशक शिरीष चौधरी असून सर्व हक्क श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट यांच्या स्वाधीन आहेत. शंकर महाराजांनी पुस्तक लिहिण्यास आशीर्वाद दिला आहे, असे स्पष्ट करताना दशहत पसरविण्यासाठी हे पुस्तक लिहिल्याचे मत सत्यशोधन अहवालात समितीने नोंदविले आहे.