शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूर, नागलकर हॉस्पिटल येथे आज रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:09 IST

अमरावती : लोकमत वृत्तपत्र समूह व जेसीआय अमरावती गोल्डन यांच्यावतीने १२ जून रोजी स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक ...

अमरावती : लोकमत वृत्तपत्र समूह व जेसीआय अमरावती गोल्डन यांच्यावतीने १२ जून रोजी स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा तथा बाबूजी यांच्या जयंतीप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागलकर हॉस्पिटल येथे सकाळी ९ ते १ या वेळेत हे शिबिर होईल. याप्रसंगी उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन अध्यक्ष जेसी डॉ. सचिन अग्रवाल, सचिव जेसी सचिन अवघड, माजी अध्यक्ष जेसी डॉ. रश्मी नागलकर यांनी केले आहे.

दर्यापूर येथे कृषिउत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये १२ जुलै रोजी सकाळी १० ते २ या वेळेत रक्तदान शिबिर होईल. उद्घाटन बाजार समिती सभापती बाबाराव बरवट करतील. शिबिरात शिवशक्ती गणेशोत्सव मंडळ, हनुमान व्यायाम क्रीडा मंडळ (बनोसा), बजाज फिनसर (दर्यापूर), श्रीराम गणेशोत्सव मंडळ (गांधीनगर), डॉक्टर्स असोसिएशन यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. शिबिराला तहसीलदार योगेश देशमुख, मुख्याधिकारी गीता वंजारी, गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पाटील, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक संतोष डाबेराव, पीएसआय रविकिरण खंडारे, प्रा. गिरीधरराव बोरखडे, बाजार समिती उपसभापती नरेंद्र ब्राह्मणकर यांचीही उपस्थिती राहणार आहे.