शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

इर्विन चौकात भाजपचे निदर्शने

By admin | Updated: August 17, 2015 00:06 IST

वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक मंजूर होऊ नये, यासाठी काँग्रेस खासदारांनी लोकसभा व राज्यसभेत गोंधळ घातल्याच्या निषेधार्थ येथील भाजप कार्यकर्ते, ...

काँग्रेस खासदारांचा निषेध : जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपअमरावती : वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक मंजूर होऊ नये, यासाठी काँग्रेस खासदारांनी लोकसभा व राज्यसभेत गोंधळ घातल्याच्या निषेधार्थ येथील भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी रविवारी निदर्शने केली. काँग्रेसने नैतिकता गमावली असून देशात एकच कर प्रणाली लागू होत असताना खासदारांचा गोंधळ संयुक्तिक नाही, असा आरोप करण्यात आला.स्थानिक इर्विन चौकात भाजपने निदर्शने करून काँग्रेस खासदारांचा निषेध केला. आ.सुनील देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, भाजपचे गटनेता संजय अग्रवाल, जिल्हा संघटनमंत्री शिवराय कुळकर्णी, भाजपच्या महिला शहराध्यक्ष राधा कुरील, मिलिंद चिमोटे, अशोक डोंगरे आदींच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा, राज्यसभेत चालविलेल्या गोंधळाचा कडाडून विरोध केला. यावेळी निषेध नोंदविताना देशात एकच कर प्रणाली लागू असताना काँग्रेस खासदारांनी सुरु केलेला गोंधळ निरर्थक आहे. प्रशासनात पारदर्शकता येऊन नागरिकांची कराच्या रुपात होत असलेली फसवणूक जीएसटीमुळे रोखली जाणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय यांनी संसदेत जीएसटी ही करप्रणाली लागू होऊ दिली नसल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. जीएसटी ही कर प्रणाली नागरिकांच्या हिताची आहे. संसदेत होत असलेला गोंधळ हा देशाचा अपमान आहे, असे आ. सुनील देशमुख म्हणाले. तसेच काँग्रेस खासदारांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा त्यांनी दिला. गत आठवड्यात राज्यसभेचे कामकाज बघण्यासाठी विदेशातील एक प्रतिनिधी मंडळ आले असता काँग्रेस खासदारांनी केलेला तमाशा देशाची नाचक्की करणारा ठरला, असा आरोप तुषार भारतीय यांनी केला. यावेळी गंगा खारकर, प्रणव कुळकर्णी, रमेश शर्मा, छाया अंबाडकर, लता देशमुख, विश्वजीत डुमरे, उमेश निलगिरे, भारती डेहनकर, प्रतिभा तिडके, रचना टापर, शिला मोकलकर,पल्लवी लेव्हरकर, नीता माहुलकर, चेतन गावंडे, प्रशांत शेगोकार, राजू कुरील, विजय धामोरीकर, सतीश मोकलकर विशाल डहाके, राजेंद्र मेटे, सुहास ठाकरे, रुपेश दुबे, मिलिंद कारले, अविनाश चुटके, रवी शिंदे, शाम हिंगासपुरे, सुनंदा शेंद्र, शीतल वाघमारे, तनुजा देशमुख, ज्योती वैद्य, अलका सप्रे, छाया खंगाडे आदी उपस्थित होते.इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात काँग्रेस खासदारांचा निषेध नोंदविण्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांना भर पावसाचा सामना करावा लागला. आमदार सुनील देशमुख यांनी मनोगत व्यक्त करण्यास सुरुवात करताच पावसाने हजेरी लावली. त्यानंतर तुषार भारतीय मार्गदर्शन करायला लागले तर पाऊस जोरात बरसला. त्यामुळे भाजपला काँग्रेस खासदारांचा निषेध भर पावसात नोंदवावा लागला.